Home यवतमाळ यवतमाळ येथील महानायक चौकात बंजारा नायक वसंतराव नाईक साहेब यांची ११० वी...

यवतमाळ येथील महानायक चौकात बंजारा नायक वसंतराव नाईक साहेब यांची ११० वी जयंती सोहळा संपन्न – मोहन जाधव

104

यवतमाळ दि.१ जूलै – महानायक_ महामानव देवदूत वसंतराव नाईक साहेब, बंजारा हृदयसम्राट, व “गहूलि गावचे सुपुत्र” समाज सुधारक, कृषिविद्यापीठाचे जनक, प्रभावी वक्ता, उच्च विद्याभूषित, राजनीति तज्ञ, पंचायतराज जनक, कृषिरत्न, शेतकऱ्यांचे केवारी, आश्रम शाळेचे जनक, रोजगारहमी के जनक, विद्युत प्रकल्पाचे जनक, एम. आय. डी. सी. चे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सिडको नवि मुम्बई चे जनक, “लागोपाठ 11 वर्ष 6 महीने 5 दिवस मुख्यमंत्री पद भूषविणारे व हरितक्रांतिचे प्रणेते महानायक “वसंतराव नाईक साहेब” यांची आज दि.१ जूलै २०२३ रोजी ११० वी जयंती यवतमाळ येथील महानायक चौकात मोठ्या थाटात पार पडली,

या प्रसंगी वृक्षारोपण व शेकडो वृक्षांचे वाटप केल्या नंतर मेडिकल कॉलेज येथील नाईक साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद येथील महानायकांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन व माल्याअर्पण करून उपस्थित सर्व प्रमुख वक्ते, पुढारी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले, दिवसभर उत्साहात पार पडलेल्या महानायकांच्या सुवर्ण जयंती सोहळ्याचे आयोजन -गोर बंजारा उत्सव समितीने पुढाकार घेवून प्रथमच मोठ्या उत्साहात जयंती सोहळा संपन्न झाले.