
जालना /लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय ग्रुप कंपनीने लाखों गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केलेली आहे.मैत्रेयमध्ये गेल्या सात वर्षांपासून गुंतवणुकदारांचे परतावे अडकलेले आहेत.या कंपनीत अडकलेले परतावे मिळावेत यासाठी २०१६ पासून मैत्रेय गुंतवणुकदार हैराण आहेत.दरम्यान,यासाठी गुंतवणुकदारांच्या वतीने राज्यभरात प्रशासकिय कार्यालयावर मोर्चे नेण्यात आले, विविध लेबल लावून आंदोलने झाली,होत आहेत.

शासन,प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली.गुंतवणुकदारांनी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत मैत्रेय मॅनेजमेंटच्या विरोधात तक्रारी करून गुन्हे दाखल झालेले आहेत.मैत्रेयच्या संचालक मंडळाला अटकही करण्यात आली.आर्थिक गुन्हे विभागाने कार्यवाही करून मैत्रेयची मालमत्ता जप्तही केली,मैत्रेयचे खाते गोठवले. मात्र गुंतवणुकदारांना परतावे अजूनही मिळालेले नाहीत.मैत्रेय पिडित गुंतवणुकदारांनी एकत्रीत येवून २ जून २०२२ मध्ये मैत्रेय प्रतिनीधी आणि गुंतवणूकदार संघटनेची स्थापना करून मैत्रेय परतावे हे MPID कायद्याअंतर्गत न्यायालयाच्या आदेशानूसारच शासना मार्फत मैत्रेयची जप्त मालमत्ता विक्री करून गुंतवणुकदारांना परतावे मिळू शकतात.हि बाब संघटना कार्यकारिणीच्या लक्षात आल्याने संघटनेने त्या दृष्टीने अचूक भुमिका घेवून मुंबई शेशन कोर्टात पाठपुरावा सुरू केला आहे.संघटनेच्या वतीने गुंतवणूकदारांच्या बाजूने वकिलांची टीम मैत्रेय प्रकरण काय आहे याबाबत सखोल अभ्यास करून मैत्रेय परतावे गुंतवणूकदारांना मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता संघटनेमार्फत मागवून सक्रिय झालेली आहे.संघटनेने गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने शेशन कोर्टात पाठपुरावा सुरू ठेवल्याने मैत्रेय प्रकरण निश्चितच यश मिळविण्यासाठीच्या एका विशिष्ट वळणावर येवून ठेपले आहे.गुंतवणूकदार संघटनेने सुरूवातीपासूनच मोर्चे, आंदोलन न करता मैत्रेय गुंतवणुकदारांना कोर्टामार्फतच न्याय मिळू शकतो.हा मुद्दा लक्षात घेवून त्या दिशेने वाटचाल सुरू केली.संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा एस.कदम यांच्या नियोजनबद्ध आखलेल्या प्लॅनिंग नुसार संघटना कार्यकारिणीतील जबाबदार टीमने मैत्रेयच्या जोखडात गुंतवणुकदारांचा कष्टाचा ,हक्काचा पैसा निश्चितच मिळणार आहे,अशी आशा गुंतवणुकदारांमध्ये निर्माण झाली आहे.












































