Home महत्वाची बातमी अँड.शिवाजीराव मोघे यांचा जीवनप्रवास आदर्शवत व प्रेरणादायी ठरणारा

अँड.शिवाजीराव मोघे यांचा जीवनप्रवास आदर्शवत व प्रेरणादायी ठरणारा

169

 माजी मंत्री आ.यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन…!
यवतमाळ / प्रतिनिधी
जीवनात आलेल्या अनेक संकटांचा सामना करीत खंबीरपणे उभे राहत समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी अँड. शिवाजीराव मोघे साहेबांनी केलेले कार्य उल्लेखीय असुन त्यांचा हा जीवन प्रवास येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी ठरणारा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.यशोमती ठाकूर यांनी केले आहे. लेखक उत्तमराव गेडाम लिखित “समाजभूषण शिवाजीराव मोघे” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्याचे मा. सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.शिवाजीराव मोघे यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणीक, सांस्कृतिक जीवनप्रवास लेखक उत्तमराव गेडाम यांनी “समाजभूषण शिवाजीराव मोघे” या पुस्तकातून मांडला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथे शुभम मंगल कार्यालयात एका दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन व विमोचन करण्यात आले. माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे यांच्या जीवनातील अनेक चढ उताराचा लेखाजोखा मांडत मोघे यांचे आयुष्य इतरांसाठी कस प्रेरणादायी ठरणार आहे. याचा उल्लेख सदर पुस्तकातून लेखकांनी विषद केला.
दर्यापूर येथे पार पडलेल्या पुस्तकं प्रकाशन सोहळ्याला विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या प्रसंगी अध्यक्षस्थानी गुजरात राज्यातील माजी खासदार तथा अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमाजीभाई दामोर तर विशेष अतिथी म्हणुन राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री व विद्यमान आमदार अँड. यशोमतीठाकूर, श्री.अँड. शिवाजीराव मोघे, आदिवासीं विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरलालजी बोडात, दर्यापूरचे आमदार बळवंतरावजी वानखडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव सरकुंडे, बिरसाजी तिर्की, सौ.गीताश्री उराव, रामसाहेब चव्हाण, नंदिनीताई टारफे, महादेवरावजी वैद्य, या पुस्तकाचे लेखक उत्तमराव गेडाम, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे हे उपस्थितीत होते. यावेळी बोलतांना ठाकुर म्हणाल्या की मोघे साहेबांनी कधीच सत्तेची हवा न लागु देता आपल्या कडे आलेल्या प्रत्येकांच्या समस्येचे निराकरण केले आहे.मंत्री असतांना साहेबांनी केवळ पीडित शोषित समाजाच्या उत्कर्ष कसा साधता येईल व त्यांना विकासाच्या प्रवाहात कसे सामील करता येईल याचा विचार करून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या त्यांचे केलेले कार्य व त्यांचा जीवन प्रवास इतरांपुढे नेहमीच आदर्श ठेवणारा व प्रेरणादायी असा असुन त्यांच्या जीवन प्रवासाचा अभ्यास केल्यास तो मार्गदर्शक ठरू शकतो असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महाराष्ट्र शाखेद्वारे करण्यात आले होते. यावेळी असंख्य समाजबांधव उपस्थित होते.