Home यवतमाळ घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती बेकायदेशीर निवड प्रकरणात सुनावणीची नोटीस…!

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती बेकायदेशीर निवड प्रकरणात सुनावणीची नोटीस…!

169
➡️ जिल्हा उपनिबंधक कार्यालयात 2 जुन रोजी सुणावणी होणार.!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी : घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्या उर्फ नितीन अशोक कोठारी, उपसभापती सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर यांची निवड प्रक्रिया ही अनेक नियमांना डावलून बेकायदेशीर करण्यात आली असून ती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल केलेला दावा क्रमांक 04/2023 प्रकरणातील सुनावणीची नोटीस घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठ संचालकांना तामील करण्यात आली असून एक प्रत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांना संबंधित संचालकांना तामील करण्यासाठी पाठविण्यात आली आहे. सदरची सुणावणी नोटीस बजावून पोहोच पावती सह सुनावणी पुर्वी दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांनी दिले आहे.
यासाठी आठ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांचे कडे अपिल दाखल केले होते. यामुळे घाटंजी तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
अपिल दाखल करणाऱ्यात माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष तथा संचालक आशीष सुरेशबाबू लोणकर (रा. शिरोली), आशीष माधवराव भोयर (रा. अंजी नृसिंह), गुणवंत लेणगुरे (रा. मानोली), सर्विद जाधव (रा. घाटंजी), अकबर तंवर (रा. घाटंजी), कैलास दादाराव कोरवते (रा. शिरोली) हे आठ संचालक आहेत. तर प्रतिवादी म्हणुन प्राधिकृत अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी तथा सहाय्यक निबंधक एस. व्ही. कुडमेथे, नवनिर्वाचित सभापती भैय्या उर्फ नितिन अशोक कोठारी (रा. भांबोरा), नवनिर्वाचित उपसभापती सचिन सुभाषचंद्र देशमुख पारवेकर (रा. पारवा) आदींचा समावेश आहे.
2 जुन रोजी होणाऱ्या सुनावणीची नोटीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष व संचालक तथा संचालक आशिष सुरेशबाबु लोणकर (रा. शिरोली), आशिष भोयर (रा. अंजी (नृसिंह)), गुणवंत लेणगुरे (रा. मानोली), सर्विद जाधव (रा. घाटंजी), अकबर तंवर (रा. घाटंजी), रमेश डंभारे (रा. आमडी), कैलास कोरवते (रा. शिरोली) आदीं संचालकांना बजावण्यात आली आहे.
ज्या अर्थी अर्जदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे व ईतर 7 यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 22 (4) नुसार कार्यवाही करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ कार्यालयात प्रकरण दाखल केले आहे. प्रस्तुत प्रकरणात 2 जुन रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय (यवतमाळ) नानासाहेब चव्हाण यांच्या समक्ष सुनावणी करिता ठेवण्यात आली आहे. त्या अर्थी संबंधित 8 संचालकांना तसेच सभापती व उपसभापती यांना सुचित करण्यात येते की, प्रस्तुत प्रकरणाचे सुनावणीसाठी उपरोक्त तारखेस या कार्यालयात उपस्थित राहुन किंवा आपले वकीलामार्फत आपले लेखी म्हणने 2 प्रतित दाखल करावे. तसेच आपल्या म्हणण्याच्या पृष्ठार्थ आवश्यक ती कागदपत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रेकार्ड व या प्रकरणांशी संबंधित मुळ रेकार्ड सुनावणीच्या वेळेस सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असे सुनावणी नोटीस मध्ये नमुद केले आहे.