Home यवतमाळ आज माऊली मंगल कार्यालय,रेस्टॉरंट,हाँटेलची सुनावणी…!

आज माऊली मंगल कार्यालय,रेस्टॉरंट,हाँटेलची सुनावणी…!

139

नगरपरिषद मालमत्तेचे नुकसान; ८७ हजार रुपयाचा दंड

पांढरकवडा : येथील माऊली मंगल कार्यालय , रेस्टॉरंट, हॉटेल करीता कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि संपूर्ण बांधकाम अवैधरित्या केले असल्यामुळे त्याचा वापर ताबडतोब थांबवून सीलबंद करण्यात यावे आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे माजी नगरसेवक अंकित नैताम यांनी केली आहे.

आता या वादग्रस्त गंभीर प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कारवाईचा फास आवळला असून माऊली सेलिब्रेशनहाँलचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्यासाठी आज दि.२४ मे रोजी मुख्याधिकारी यांचे दालनात सुनावणी ठेवली आहे.यामुळे शहरातील इतरही अवैध बांधकामधारक व कर बुडव्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कॉटेज हॉस्पिटल रोडवरील माऊली मंगल कार्यालय , रेस्टॉरंट व हॉटेल करीता पोलीस, ग्रुह,शाँप अँक्ट,फायर अँक्ट, मुंबई पोलीस अँक्ट,अन्न व औषध प्रशासन विभाग,नगर रचना विभाग, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग आदींच्या कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता, संपूर्ण बांधकाम अवैधरित्या केले आहे.असा ठपका ठेवण्यात आला आहे.

१७ मे २०२३ रोजी रात्री दहा वाजताच्या अंदाजे माऊली मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापक यांनी जेसीपी द्वारे पूर्णपणे रस्ता खोदून, त्या ठिकाणी त्यांच्या मंगल कार्यालयाच्या विषारी दुर्गंधयुक्त सांडपाणी बेकायदेशीरीत्या सोडण्यासाठी सिमेंट पाईप टाकत असतांना त्या ठिकाणी असलेली नगर परिषदेची पिण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय, नेताजी सुभाषचंद्र बोस वार्ड,कोलाम पोड, शास्त्री वॉर्ड या ठिकाणी पिण्याची पाणी मिळाले नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.त्यामुळे स्थानिक नागरिक चिडून गेले.

या संपूर्ण जागेचा व त्यावरील इमारतीचा उपयोग / वापर हा वाणिज्य आणि कमर्शिअल असून नगरपरिषदेचा कोट्यवधी रुपयांचा टॅक्स आणि इतर महसूल गेल्या ५ वर्षापासून बुडविलेला आहे. बेकायदेशीर बांधकाम करून त्या ठिकाणी आपला धंदा सुरू केलेला आहे. संबंधित मंगल कार्यालयाला तातडीनं सीलबंद करण्यात यावे व बेकायदेशीर मंगल कार्यालयावर हातोडा ठोकण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.आता या संदर्भात आज मुख्याधिकारी यांचे दालनात सुनावणी होणार आहे.

*मालमत्ता नुकसानीबाबत ८७ हजाराचा दंड*
कोणतीही प्रकारची परवानगी न घेता नगर परिषद रस्त्याचे नुकसान केल्यामुळे ८७ हजार २२० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच तात्काळ रस्ता पुर्ववत करुन देण्याचे निर्देश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी संबंधीतांना दिले आहे.

*महसूल बुडविल्याचीही चौकशी*
मागील पाच वर्षापासून शासनाकडे कोणतीही अक्रुषक आकारणी व रुपांतरीत कराचा भरणा केलेला नसल्याबाबत सखोल चौकशी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी मंडळाधिकारी व तलाठी यांना दिले आहे.