Home बुलडाणा महाराष्ट्र मराठा सोयरीक चे कार्य उल्लेखनीय- पुरुषोत्तम खेडेकर

महाराष्ट्र मराठा सोयरीक चे कार्य उल्लेखनीय- पुरुषोत्तम खेडेकर

123

सुनील जवंजाळ यांना मराठा लोकनायक पुरस्कार

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:-मराठा समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा दूर करून समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम सुनील जवंजाळ पाटील करीत आहे. याची दखल घेत मराठा समाज बांधवाकडून त्यांना मराठा लोकनायक उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. चिखली येथे हा समारंभ सोहळा पार पडला. सौ रेखाताई खेडेकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिवसभर चिखली येथील वधू-वर परिचय मेळाव्यात हजेरी लावून वधुवर पालकांचा उत्साह वाढविला.
छत्रपती संभाजी महाराज जयंती आगळावेगळी व कृर्तीयुक्त साजरी करावी या उद्देशाने सुनील जवंजाळ यांच्या पुढाकारातून 14 मे रोजी चिखली येथे शिवाजी विद्यालयात वधुवर परिचय मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याला मोठा प्रतिसाद मिळून 800 मुला मुलांनी आपला परिचय दिला. जवंजाळ यांचे कार्य दखलपात्र आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत चिखलीचे माजी नगराध्यक्ष नंदूभाऊ सवडतकर,पत्रकार गणेश निकम,जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अशोकराव खरात, माधवराव जपे,रामेश्वर पाटील, अशोकराव चौधरी, प्रल्हादराव भुसारी स्वप्निल तायडे यांनी मराठा लोकनायक पुरस्कार देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या समाज बांधवांनी उत्कट प्रतिसाद दिला व आमदार श्वेताताई महाले, मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्री रमाकांत गलांडे जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, रमेश बाहेकर ,संजीवनी ताई शेळके ,सुरेखाताई सावळे, पंडितराव देशमुख, भगवानराव कानडजे, अरविंद देशमुख ,अण्णासाहेब मळसणे, काशिनाथ शेळके, पळसकर, संजय चेक, पुष्पा जवंजाळ. मीनाक्षी गवते अंजली देशमुख , दिनकरराव बावस्कर विकास चव्हाण आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्री-वेडिंग न करणे, तंबाखू मुक्ती शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मेळाव्यात आलेल्या पहिल्या पाच मुलींच्या व महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संस्थापक जवंजाळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर महिला भगिनींना स्थान देण्यात आले. त्यामुळे ते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉक्टर सतेंद्र भुसारी उर्मिला बावसकर,प्रा. अनिल रिंढे यांनी तर आभार नंदूभाऊ सवडतकर यांनी केले.
खेडेकर साहेब यांनाही भावले सामाजिक कार्य-जवंजाळ पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून बुलढाणा येथून सुरू असलेल्या महाराष्ट्र मराठा सोयरीक या सामाजिक लोक चळवळीचे श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी कौतुक केले.सुनील जवंजाळ पाटील यांच्यासारखे झपाटलेली माणसे असतात म्हणून तर समाजाला दिशा मिळते असे ते म्हणाले. महाराष्ट्र मराठा सोयरीक या लोक चळवळीला बळ देण्याचे त्यांनी शब्द दिले .
मराठा समाज बांधवांनी घेतली प्री-वेडिंग न करण्याची शपथ
लग्न समारंभात प्री-वेडिंग शूट करण्याचे फॅड आले आहे. या घातक प्रथेने अनेक चुकीच्या बाबी पुढे येत आहे. त्यामुळे ही प्रथाच नको असा सूर समाज बांधवांचा निघाला. यावेळी पालकानी तंबाखू मुक्ती सोबत प्री-वेडिंग न करण्याची शपथ घेतली. ही बाब सामाजिक समस्या बनण्यापूर्वी तिला लगाम घातला पाहिजे या भावनेतून लग्न समारंभातून ही बाब हद्दपार करावी असे आवाहन सुनील जवंजाळ यांनी केले आहे.