Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड...

पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मान..!

159

अयनुद्दीन सोलंकी 

————————-
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आदींच्या उपस्थितीत पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना चषक, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.

यवतमाळ जिल्हा पोलीस दलात दर महीण्याला गून्हे परिषद घेतली जाते. सदर गून्हे परिषद मध्ये मागील महिन्यात विविध हेडखाली सर्वात चांगली कामगिरी करणारे संबंधित पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येते.

यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांनी सातत्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे पारवा पोलीस स्टेशनला यवतमाळ जिल्ह्यात सर्वात चांगली कामगिरी करणारे प्रथम क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून पारवा पोलीस स्टेशनला गौरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे महीला पोलीस शिपाई जयश्री गोडे यांचे सातत्याने संगणकीय चांगल्या कामगारी मुळे पारवा पोलीस स्टेशनला हा गौरव प्राप्त झालेला आहे, अशी माहिती पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.