Home यवतमाळ पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : ‘व्हाइस ऑफ मीडिया’च्या...

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : ‘व्हाइस ऑफ मीडिया’च्या वतीने धरणे आंदोलन

124

यवतमाळ – माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. मात्र, माध्यमकर्मींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या वतीने गुरुवारी दिनांक 11 मे रोजी यवतमाळ येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना देण्यात आले.

पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व्हाइस ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभरात एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघू दैनिक) यांना मारक आहे. लघू दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाप्रशासनाला देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, प्रा. अंकुश वाकडे, किशोर जुनुनकर, जयंत राठोड, सूरज पाटील, पवन लताड, रवी राऊत, संजय राठोड (आर्णी), नितीन भूसरेड्डी, विजय बुंदेला,विवेक वानखडे, विजय मालखेडे, रवीश वाघ, राहुल वासनिक, प्रवीण राठोड, सचिन कोयरे, रोशन सावंत, धनंजय उपगनलावार, किरण कोरडे, गौतम गायकवाड, शाकीर शेख, मकसूद अली, सय्यद मतीन, संतोष डोमाळे, आकाश रायबोले, रवी चरडे, हमीद पठाण, रुस्तम शेख, प्रफुल मेश्राम आदींची उपस्थिती होती.
(…चौकट…)

सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठींबा

‘व्हाइस ऑफ मीडिया’च्या आझाद मैदानातील धरणे आंदोलनाला सामाजिक, राजकीय संघटनांनी पाठींबा दिला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, आम आदमी पक्षाचे विदर्भ सहसंयोजक भाई अमन, काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलिस निरीक्षक नंदकिशोर पंत, पत्रकार संदीप खडेकर, विवेक गावंडे, मयूर वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे संजय मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सुधीर कैपिल्यवार, समता पर्व माजी अध्यक्ष प्रमोदिनी रामटेके, भीम टायगर सेनेचे श्याम बन्सोड यांच्यासह बीआरएसच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनाना भेट दिली.