Home पश्चिम महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती” पुणे शहर उच्च शिक्षित कार्यकारणी कार्यकारणी जाहीर.

“पत्रकार संरक्षण समिती” पुणे शहर उच्च शिक्षित कार्यकारणी कार्यकारणी जाहीर.

213

पुणे , प्रतिनिधी  – पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,प्रदेश सचिव अनिल चौधरी, पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील वतीने पत्रकार संरक्षण समिती पुणे शहर अध्यक्ष पदी रोहित दळवी (दै.संध्या) यांची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ देवराम ऊंद्रे पाटील यांच्या हस्ते नुकतीच जिल्हा संपर्क कार्यालयात दळवी यांची निवड करण्यात आली.


महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर कार्यकारणी निवड करण्यात आली.प्रसंगी मांजरी बुद्रुक चे माजी उपसरपंच अमित आबा घुले पाटील, जिल्हा अध्यक्ष नाथाभाऊ ऊंद्रे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिलवंत कांबळे,शहर अध्यक्ष रोहीत दळवी,हवेली अध्यक्ष प्रा.वाळेकर सह पुणे शहारातील प्रसिध्दी विविध माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संरक्षण समिती काम करत असल्याचे जिल्हा अध्यक्ष ऊंद्रे मार्गदर्शन करताना सांगितले..पत्रकार संरक्षण समितीचे उल्लेखनीय काम असल्याने पुणे शहर अध्यक्ष रोहित दळवी(दै.संध्या)यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पत्रकार संरक्षण समिती काम करणार असल्याचे पुणे शहर उपाध्यक्ष विनोद धसाडे यांनी सांगितले.सुत्र संचलन रोहित दळवी यांनी केले. आभार विनोद धसाडे यांनी मानले.