
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : आज गुरुवार रोजी खापरी (नाका) घाटंजी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये कापसाला प्रतिक्विंटल १०,००० रुपये हमीभाव जाहीर करा, सोयाबीनला ७००० रुपये हमीभाव जाहीर करा, तुरीची व चण्याची नाफेड मार्फत ऑनलाइन नोंदणी चालू करा.

या आदीं प्रमुख मागण्यासह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्का जाम आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या आंदोलनामध्ये घाटंजी तालुका शिवसेना प्रमुख मनोज ढगले, घाटंजी शहर शिवसेना प्रमुख प्रशांत मस्के, शिवणी विभाग प्रमुख डॉ. अभिजीत निमकर, पारवा सर्कल उप तालुकाप्रमुख मुकुंदा बूरकुंडे, पार्डी सर्कल उप तालुकाप्रमुख संतोष धेनावत, शिवणी सर्कल उप तालुकाप्रमुख भोपीदास राठोड, तालुका संघटक प्रदीप खोब्रागडे, घाटंजी तालुका युवासेना प्रमुख अर्जुन चौधरी, शिवशक्ती भीमशक्तीचे तालुकाप्रमुख सचिन बनसोड, महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख भावनाताई राऊत, महिला आघाडीच्या संगीताताई हस्ते, उपविभाग प्रमुख संजय आडे, उपविभाग प्रमुख मंगेश गेडाम, दीपक परचाके, पवन लांडगे, उपशहर प्रमुख विशाल वातीले, विभाग प्रमुख शैलेश चव्हाण, काशिनाथ वाघाडे, शाखाप्रमुख विजय वडेश्वर, दिलीप काकडे सह अनेक घाटंजी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते, अशी माहिती आर्णी विधानसभा प्रसिद्धी प्रमुख प्रशिल ढोके यांनी दिली.चक्का जाम आंदोलना नंतर घाटंजी पोलीसांनी आंदोलन कर्ता शिवसैनिकांना स्थानबद्ध केले.











































