Home विदर्भ विदर्भातील ” देव तारी त्याला कोण मारी” घडलेली घटना…!

विदर्भातील ” देव तारी त्याला कोण मारी” घडलेली घटना…!

196

चिमुकल्या अद्वय ची करून कहाणी
आई व वडिलांचा अपघातात मृत्यू

मृतक प्रिया बाळकृष्ण आडे

नारायणपूर. प्रतिनिधी
वर्घा –  समुद्रपूर् तालुक्यांतील धामणगाव येथील रहिवाशी असणाऱ्या श्री बाळकृष्ण आडे वय 35वर्ष व त्यांच्या पत्नी सौ.प्रिया बाळकृष्ण आडे वय 28 वर्ष हे दाम्पत्य आपल्या चिमुकल्या अद्वय वय 15 महिने सह बाळकृष्ण चे बहिणीकडे दुचाकीने जात होते परंतु रस्त्यातच त्यांचा अपघात झाल्याने सौ प्रिया व बाळकृष्ण या दोघांचाही मृत्यू झाला परंतु त्यांच्या सोबत असलेला चि. अद्वय वय 15 महिने हा मात्र सुखरूप बचावला त्या मुळे दैव बलवत्तर असल्याचं बोललं जातंय परंतु आई वडील यांचे छत्र हरलेल्या 15 महिन्याच्या चिमुकल्या अद्वय ला मायेची ऊब मिळने महत्वाचे आहे त्यामुळे सर्व सामाजिक संघटना तसेच शासस्तरावरून चिमुकल्या अद्वय ची मदत होणे अपेक्षित आहे आई बाबा कळायच्या आधीच पालकांचं सोडून जाणं मन हलवून जात तेव्हा शासन सामाजिक संघटना तथा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मृतक बाळकृष्ण आडे

अन् म्हातारपणाची आशा मावळली घरावर दुःखाचा डोंगर बाळकृष्ण व त्याची पत्नी सौ प्रिया यांच्या अपघाती मृत्यूनंतर म्हाताऱ्या आई वडील यांचा आधार गेल्यामुळे त्यांच्यावर कठीण प्रसंग निर्माण झाला आहे.