Home यवतमाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार सह ईतरांविरुदध घाटंजी पोलीस ठाण्यात...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार सह ईतरांविरुदध घाटंजी पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल..!

241
  • ➡️ देवानंद पवारसह इतरांची घाटंजी पोलीस स्टेशन मधुन जामीनावर सुटका..!

  • (अयनुद्दीन सोलंकी)
    ————————
    घाटंजी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार सह ईतरईतरांविरुद फिर्यादी सिंपल दत्ता पवार (वय 28, रा. दत्तापूर) हिच्या लेखी तक्रारीवरुन 7 आरोपी विरुद्ध भादंवि कलम 294, 506, 143, 147, 148, 323 अंतर्गत दंगलीचे गुन्हे घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी करण अनिल राठोड (वय 23, रा. दत्तापूर) यांच्या लेखी तक्रारीवरुन राजु रामचंद्र राठोड सह 7 आरोपी विरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 294 व 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    सदर प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम आणि पोलीस नायक विनोद मेश्राम हे करित आहे.

    विशेष म्हणजे 15 आरोपी पैकी 12 आरोपींचा जामीन घाटंजी पोलीस ठाण्यातुन मंजुर करण्यात आलेला आहे. तर तिन आरोपींचा जामीन अद्यापही झालेला नाही, अशी माहिती ठाणेदार सुषमा बावीस्कर यांनी दिली.

    घाटंजी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंपल पवार हिच्या तक्रारीवरुन माझे आतेभाऊ राजु रामचंद्र राठोड हे यवतमाळ येथे राहतात. गत महिन्याच्या 15 जानेवारी रोजी गैरअर्जदार साहेबराव नरसिंग पवार (वय 45, रा. दत्तापूर) याचा वाढ दिवस होता. वाढ दिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार (वय 50, रा. दत्तापूर) हे सुद्धा दत्तापूर येथे आले होते. वाढ दिवसाचा कार्यक्रम सुरू असतांना साहेबराव व देवानंद पवार हे राजु राठोड हा थर्डक्लास माणुस आहे, तो बाप बदलवितो, दादाचे नांव बदलवितो, तसेच त्याची खानदान थर्डक्लास आहे. त्याला चपलीने मारा, कुरहाडीने मारा, सगळे बाया मिळुन त्याची काॅलर पकडा, मी त्याला जेल मध्ये टाकतो असे दोघेही म्हणत होते. गावातील शाळा त्याच्या बापाची आहे काय? असे म्हणत होते. तर फिर्यादी सिंपल पवार हिला शिविगाळ करुन तु लंगडी आहेस. तुझ्याशी जे होते ते करुन घें, असे म्हणुन साहेबराव पवार हा अश्लील भाषेत शिविगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी देत होता. अशा तक्रारीवरुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, अगोदर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार व शिक्षक भारती संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार या दोघांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, नंतर फिर्यादी सिंपल राठोड हिने यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आरोप करुन पोलीस अधीक्षक यवतमाळ व उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे कडे लेखी तक्रार दाखल केल्याने, सदर प्रकरणात नंतर ईतर आरोपी विरुद्ध गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहे.

    तथापि, फिर्यादी सिंपल दत्ता पवार हिच्या तक्रारीवरुन आरोपी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस देवानंद पवार (वय 50), साहेबराव पवार (वय 45), हरसिंग पवार (वय 65), खुशाल पवार (वय 52), प्रेमदास पवार (वय 40), सावन पवार (वय 30), करण राठोड (वय 25), यादव पवार (वय 37) या 8 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर फिर्यादी करण अनिल राठोड (वय 23, रा. दत्तापूर) याच्या तक्रारीवरुन अक्षय पवार (वय 29), अतुल राठोड (वय 35), राजु रामचंद्र राठोड (वय 50), रोशन राठोड (वय 24), भवन राठोड (वय 35), दत्ता पवार (वय 55), मधुकर राठोड (वय 55, सर्व रा. दत्तापूर) या 7 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस सरचिटणीस देवानंद पवार विरुद्ध यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी इत्यादी न्यायालयात गंभीर स्वरुपाचे गुन्हे प्रलंबित व सुरु आहे, हे येथे उल्लेखनीय.

    घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अपराध क्रमांक 30/2023 प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस नायक विनोद मेश्राम हे करित असुन अपराध क्रमांक 31/2023 प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक विलास सिडाम हे करित आहे.