
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – पारवा येथे स्व. तुळशीरामजी बहुउद्देशीय मागासवर्गीय विकास मंडळ पारवा (र.न.4998/98) द्वारा भव्य पारवा प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. या लीग सामन्याचे उदघाटन 1जानेवारी रोजी माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी पारवा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संगीताताई मडावी ह्या होत्या. या क्रिकेट लीग सामन्याचे युट्युब वर थेट प्रसारण करण्यात आले होते. यात 8 संघांची निवड करण्यात आली.10 दिवस चाललेल्या या लीग सामन्याच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर सोनखास व किंग्स इलेव्हन जिकरांन यांनी धडक मारली होती. अतिशय रोमहर्षक झालेल्या या अंतिम क्रिकेट सामन्यात विजेता संघ ठरला. किंग्स इलेव्हन जिकरांन तर उपविजेता संघ रॉयल चॅलेंजर सोनखास हा ठरला. बेस्ट बॅट्समन संकल्प हळदकर, तर बेस्ट बॉलर अंकुश बंडेवार यांना पारितोषिक देण्यात आले. या सामन्यात प्रथम पारितोषिक 1,25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,00,000 रुपये रोख देण्यात आले. बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलर ला Led tv चे पारितोषिक देण्यात आले. या क्रीकेट लीग सामन्यात घाटंजी, पांढरकवडा व ईतर तालुक्यातील 153 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या क्रिकेट सामन्याचे बक्षिस वितरण यवतमाळ जिल्हा काॅग्रेस कमेटीचे सरचिटणीस जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पारवा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संगीताताई मडावी, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिक मेश्राम, पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार, घाटंजी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, आयोजक गणेश मुद्दलवार, पारवा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अर्जुन आत्राम, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पोटपल्लीवर, सदस्य राजू दवणे, सदस्य बेबीताई कोरवते, सदस्य नागोराव शेडमाके, आसिफ शेख, बालू इंगोले, अजय जिल्लडवार, शाबुद्दीन लालानी, शेख शकील आदी मान्यवर उपस्थित होते.
सामने यशस्वी करण्यासाठी बिआरसिसी क्रिकेट क्लब, पारवा चे संपुर्ण खेळाडू व गणेश मुद्दलवार मित्र मंडळ पारवा यांनी अथक परिश्रम घेतले.











































