
प्रतिनिधी :- रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:- भारतीय जैन संघटना चे पदाधिकारी संतोष ललवाणी यांची मुलगी गुंजन ललवाणी हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीएच्या परीक्षेत अव्वल येत परिवारासोबत शहराचे नाव दूरवर नेऊन ठेवले आहे ,
याबाबत सविस्तर असे की भारतीय जैन संघटना शाखा देऊळगाव राजाचे पदाधिकारी तथा देऊळगाव राजा हायस्कूल देऊळगाव राजा चे शिक्षक संतोष ललवाणी यांची मुलगी गुंजन हिने दहावीचे शिक्षण देऊळगाव राजा येथे केल्यानंतर बारावीचे शिक्षण लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले त्यानंतर तिने सीए होण्याचा निर्धार केला व 2017 मध्ये सीपीटी ची परीक्षा चांगल्या गुणांनी औरंगाबाद येथे पास केली नोव्हेंबर 18 मध्ये पुणे येथे इंटर चे शिक्षण पूर्ण केले व नुकत्याच जाहीर झालेल्या सीए फायनल च्या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन करून स्वतःचे नावासोबत परिवाराचे नाव व श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरी चे नाव दूरवर नेऊन ठेवले आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे भारतीय जैन संघटना शाखा देऊळगाव राजा च्या वतीने तिचा तिच्या निवासस्थानी जाऊन छोटे खाणी सन्मान करण्यात आला,यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन,तालुका अध्यक्ष मनिष कोठेकर,शहर अध्यक्ष निलय जिंतूरकर,माजी अध्यक्ष प्रियदर्शन जिंतूरकर, राजकुमार कछोट,राजेंद्र दुगड, अनमोल जैन,राजेंद्र खडकपूरकर, उपस्थित होते.











































