Home यवतमाळ दुधगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे खेळ व क्रीडा स्पर्धेचे गट सामने संपन्न

दुधगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे खेळ व क्रीडा स्पर्धेचे गट सामने संपन्न

177

यवतमाळ: येथील दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळा दुधगाव येथे बोरी केंद्रातील बारा जिल्हा परिषद शाळेतील ३ री ते ५वी आणि ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांचे खेळ व क्रीडा गटसामने उत्साहात संपन्न झाले. १ आणि २ डिसेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत बोरी केंद्र अंतर्गत येणाऱ्या हातगाव, दुधगाव, बोरी बेसिक, बोरी(उ), तपोना,राजीव नगर, कंजरा, सावळी, बोरी उर्दू, बोरी बुजुर्ग, बोरी (कन्या), उजोना या गावातील बारा जिल्हा परिषद शाळेतील २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन दूधगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच मुस्ताक पटेल यांनी केले.

यावेळी प्रमुख अतिथि म्हणून केंद्रप्रमुख विठ्ठलदास आरू, दुधगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेचे उपाध्यक्ष साहेब खान, ज्योती गायकवाड, एम.मुस्ताक मुख्याध्यापक किशोर गुल्हाने, दुधगाव उर्दूचे मुख्याध्यापक अजमत खान आदी उपस्थित होते. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ, लंगडी, १०० व २०० मीटर धावणे, रिले, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळा फेक, योगासने, टेनीक्वाईड इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात उत्कृष्ट नियोजनासाठी क्रीडा सचिव गुड्डू मीर तसेच आंतर जिल्हा बदली झालेल्या स्वाती खोजरे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक किशोर गुल्हाने यांनी केले तर आभार अजमत खान यांनी मानले. स्पर्धेच्या आयोजनाची व सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूं शिक्षकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, दारव्हा तालुका गटशिक्षणाधिकारी विलास जाधव, विस्तार अधिकारी मिनेश काकडे यांनी कौतुक केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुड्डू मीर, कल्पक देशमुख, उमेश ढेबे, कशफुद्दीन खान, मोहम्मद अतीक, स्वाती खोजरे, फरहा तबस्सुम तसेचवबोरी केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परीक्षद शालेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.