Home मराठवाडा संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर यांची निवड,मैत्रेय गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर यांची निवड,मैत्रेय गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

217

 

जालना – लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय ग्रुप कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसलेल्या लाखों गुंतवणूकदारांना त्यांना त्यांचा,कष्टाचा पैसा परत मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे,मैत्रेय प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायासाठी राज्यामधील विविध न्यायालयात कागदपत्रांची पुर्तता करत सक्षम वकिलाची निवड करणे अशा विविध महत्वाच्या कामात अग्रेसर राहून गुंतवणूकदारांसाठी लढा उभारणारी मैत्रेय संघर्ष समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी गुंतवणुकदारांची बुलंद आवाज असलेले रविंद्र वाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली.आज शनिवारी ( ता.१९ )रोजी सकाळी ११वाजता नाशिक शहरात संघर्ष समीतीची बैठक झाली.एका छोटेखानी कार्यक्रमात समीतीच्या संस्थापक अध्यक्षा संगीता कदम यांनी रविंद्र वाटेकर यांची अध्यक्षपदाची निवड जाहिर केली.याप्रसंगी माधुरी बागूल,हेमलता पाटील,उषा माळवे,मयूर शिरोडे,शिंदोडे यांच्यासह समितीचे सभासद व इतर मैत्रेय पिडीत गुंतवणूकदार उपस्थित होते.संघर्ष समीतीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष रविंद्र वाटेकर यांचे स्वागत केले जात आहे.