Home उत्तर महाराष्ट्र पेठ तालुक्यातील काळूने,माळेगाव शिवारात साकारले ६ वनराई बंधारे

पेठ तालुक्यातील काळूने,माळेगाव शिवारात साकारले ६ वनराई बंधारे

233

कृषी विभाग व लोकसहभागातून राबवला उपक्रम.

नाशिक:- (राम खुर्दळ याजकडून) – पेठ तालुक्यातील वाहते पाणी अडवून ते जमिनीत मुरावण्यासाठी,तसेच या भागातील जमिनीतील पाण्याचा स्रोत वाढावा,यातून या आदिवासी भागात रब्बीचे क्षेत्र वाढावे याकामी पेठ तालुका कृषी विभाग व माळेगाव व काळूने गाव परिसरातील लोक सहभागातून ६ वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्यात आले.
पेठ तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे,पावसाळी शेती नंतर येथील शेतकरी मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात.रब्बीचे पीक घेण्यासाठी येथील शेतीत पाणी नसल्याने हरबरा व गहू या अन्नधान्य पिकात वाढ होऊ शकते या कामी येथील वाहते नैसर्गिक नाले,झरे वाळूच्या गोण्यातून वनराई बंधारे साकारून पाणी निचरा करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे.यावेळी तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार, मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब भोर,कृषी पर्यवेक्षक अनिल भोर,कृषी सहाय्यक योगीराज घंगळे यासह ग्रामपंचायत सदस्य गोपीनाथ धूम,व परिसरातील शेतकरी या श्रमदानात सहभागी झाले होते.

फोटो ओळी:- पेठ तालुक्यातील माळेगाव,काळुने।परिसरात शेतकरी व कृषी विभाग,व लोकसहभागातून वाहत्या नाल्यावर वनराई बंधारे बांधण्यात आले.