Home यवतमाळ पर्यावरण सेवेला निमीत्त ठरले ‘मैत्र जीवांचे@25’ रौप्य महोत्सवी स्नेहमिलनातुन निसर्ग सेवेचे व्रत...

पर्यावरण सेवेला निमीत्त ठरले ‘मैत्र जीवांचे@25’ रौप्य महोत्सवी स्नेहमिलनातुन निसर्ग सेवेचे व्रत “एसएल फाउंडेशनचा पुढाकार”

293

यवतमाळ (प्रतिनिधी) येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (दाते कॉलेज) १९९४ पासुनच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या रौप्य महोत्सवी एकत्रीकरणातुन निसर्ग सेवेचे व्रत जपले आहे. ‘मैत्र जीवांचे@25’ या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करुन गुरुजनांच्या उपस्थितीत पर्यावरण सेवेचा संकल्प युवकांनी केला.


दाते कॉलेजच्या प्रांगणात दिप प्रज्वलनानंतर सुरु झालेल्या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी यांचेसह माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. तत्कालीन दिवंगत प्राचार्य सु.ल. देशपांडे यांचेसह स्व. गो. ना. देशपांडे, स्व. शैलजा रानडे यांना अतिथींसह उपस्थित सर्वांनी श्रध्दांजली वाहिली. निधन झालेल्या वर्गमित्रांना देखील पुष्पांजली वाहण्यात आली. गुरुस्तवनाच्या स्वरात विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा शाल, रोपटे आणि गुरुवंदन पत्र प्रदान करित त्यांचे आशीर्वाद घेतले. मेळाव्याचे आयोजनाकरिता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन महेश ढवळे, सविता ढाले व अश्विन सवालाखे यांना शाल व रोपटे प्रदान करुन अतिथींनी सन्मानीत केले.
प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि संस्कारातुन घडलेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या नावानेच एस एल फाउंडेशनची मुहुर्तमेढ रोवत पर्यावरण सेवेचा ध्यास जाहीर केला. मेळाव्यात स्वागतक म्हणुन स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा बाहेर गावांमध्ये वास्तव्यास असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले. मेळाव्यात पीपीटी द्वारे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तर विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातुन अनेक वर्षांचा दुरावा मागे सारत आपल्या वर्गमित्रांसमोर वर्तमान उलगडला. दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करुन दिली, मोबाईल नंबर सेव्ह करणे, आपल्या मुलांचा परिचय करुन देणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, आपले रुसवे फुगवे दुरु करणे, गळाभेट व सेल्फीद्वारे आठवणी छायांकित करणे, आपल्या आईवडीलांची विचारपुस करणे असे गहिवर आणणारे क्षण कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित अनुभवत होते. यावेळी प्रा. नारायणराव मेहरे, प्रा. माधव सरकुंडे, प्रा. सी. बी. देशपांडे, प्रा. भीमराव ठोंबरे, प्रा. अनंत पांडे, प्रा. अशोक खंडारे, प्रा. माणिक मेहरे, प्रा. उज्वला भालेराव, प्रा. स्वाती तिवसकर, सर्वश्री विजय दिक्षीत ज्ञानेश्वरराव इटकरे, मनोहरराव बागडे आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कविता वाचन, गीत गायन, युगल गीत, नृत्य आदी कलांद्वारे आपला मैत्रभाव अर्पण करित उपस्थितांचे मनोरंजनही केले. प्रा. बुध्दरत्न लिहीतकर आणि संचाने सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. पसायदानातील “मैत्र जीवांचे” नुसार मैत्रीतुन सेवेचा ध्यास घेणारा धागा मंगेश शेटे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन विषद केला. सुत्रसंचालन योगिता घाडगे यांनी तर आसावरी पोफळी यांनी आभार मानले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. विवेक देशमुख यांनी तर चंदु हेगडे यांनी आभार मानले.
आयोजनाकरिता १८ समित्यांच्या सदस्यांनी स्वयंस्फुर्तपणे सहकार्य केले. प्रत्येकाला ग्रुप फोटोच्या प्रती तसेच आभार वजा संकल्प पत्र प्रदान करुन मेळाव्याचा समारोप झाला. मेळाव्याला एकाच बॅचला असलेल्या १७५ पेक्षा विद्यार्थी आणि विद्यार्थींनींची सहपरिवार उपस्थिती होती. आयोजनाकरिता सर्वश्री महेश ढवळे, सविता ढाले, प्रचिती काळे, पियुष मजेठिया, अतुल टाके, डॉ दिनेश विडुळकर, शंकर मडावी, मंगेश शेटे, विनोद एकुंडवार, उमेश शर्मा, आशिष शिरभाते, प्रा सचिन जयस्वाल, अश्विन सवालाखे आदींनी सहकार्य केले.
———–
चौकट
आयोजनातील टीम स्पिरीटचा आदर्श
मेळाव्याचे आयोजन भव्य असले तरी आयोजन समितीमध्ये मुख्य, अध्यक्ष, संयोजक, प्रमुख अशी कुठलीही पदे नव्हती. २०५ विद्यार्थी आणि ७३ विद्यार्थीनींचा असे दोन व्हॉट्सएप ग्रुप तयार करण्यात आले होते. सर्व मॅसेज, निमंत्रण, नियोजन, अंमलबजावणी, आढावा, समन्वय याच ग्रुपद्वारे करण्यात आले. सर्व विषय मिळुन १८ समित्यांद्वारे मेळाव्याचे नियोजन सामुहिकरित्या करण्यात आले.
———–
चौकट
पर्यावरणपुरक उपक्रमांत सक्रीय
२२ मे २०२२ ला जैवविवीधता दिनानिमीत्त सर्व वर्गमित्रांनी दाते कॉलेजला प्रत्यक्ष आणि बाहेरगावातील वर्गमित्रांसाठी त्याचवेळी गुगलमीट द्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथुनच पर्यावरण विषयात सेवारत होण्याचा संकल्प घेण्यात आला होता. त्यानंतर ई-वेस्ट, इको ब्रिक्स, स्वच्छता मोहीम, पशुकल्याण अभियान, सीडबॉल कार्यशाळा, जनजागृती दौरा, पर्यावरण कार्यशाळा आदी निसर्गाशी निगडित सर्व उपक्रमांमध्ये फाउंडेशनच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग होता.