
अमीन शाह
गावकऱ्यां मध्ये भीती निर्माण करण्यासाठी एका युवकाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करीत तो चक्क तिरडीवर जिवंत झाला , त्या युवकाच्या या भयभीत करणाऱ्या मना चा थरकाप उडवणार्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली होती , सर्वत्र भीती चे वातावरण पसरले होते त्या मुळे या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्या युवकास ताब्यात घेतले व त्या युवकांच्या मृत्यूच्या बनावाचे पितळ उघडे पाडले ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या मधील विव्हरा या गावी हा प्रकार घडला , हे अघोरी कृत्य असल्याचा प्रकार चांन्नी पोलिसांनी फेटाळून लावला . त्या युवकाचा मृत्यू झालाच नव्हता , व तो पुन्हा जिवंत होण्याचा प्रश्न उदभवत नव्हता , त्या युवकाला ताब्यात घेतल्यावर त्याची वैद्यकीय चाचणी केली असता तो युवक शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले .चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील विव्हरा या गावात एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली . त्याची अंत्यविधीची तयारी सुरू झाली . त्याला तिरडीवर ठेवण्यात आले . त्या युवकाची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली . मग अचानक त्या तरुणाला जाग आली . तो तिरडीवरुन उठून बसला . प्रशांत मेसरे असं तरुणाचे नाव आहे . तो होमगार्ड मध्ये कार्यरत होता या प्रकरणी पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेत मागची सत्यता समोर आणली . संबंधितांची चौकशी केली . डॉक्टरांनी मृत घोषित न करता किंवा मृत्यू झाल्याचा कुठलाच पुरावा नसतानाही प्रशांत मेसरे मृत झाला असल्याचे सांगितले गेले होते प्रशांत मेसरे हा होमगार्डमध्ये आहे . या युवकाची तब्येत बरी नव्हती . त्याला बुलढाणा जिल्हातल्या खामगाव येथे चक्कर आला होता . तेव्हा त्याला खामगाव येथील रुग्णालयात दाखविण्यात आले . होते तेंव्हा त्याची तब्बेत ठणठणीत असल्याची माहिती खामगाव येथील त्या डॉक्टरने पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळाली असून घडलेल्या घटने मुळे गावकरी प्रचंड घाबरले होते परंतु पोलिसांमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला ,











































