Home विदर्भ पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वतिने नेञरोग निदान शिबीर व मोफत औषध...

पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वतिने नेञरोग निदान शिबीर व मोफत औषध वाटप उपक्रम संपन्न*

251

 

अमरावती / धामणगाव ( रेल्वे ) – स्व.सखुबाई शंकरराव उमरे व हनुमंतजी मेश्राम यांच्या स्मृती दिनानिमित्त पोलीस मिञ परिवार समन्वय समिती धामणगाव रेल्वे विभागाच्या वतिने नेञरोग निदान शिबीर व माई हाॅस्पिटल यांच्या वतिने औषध वाटप प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित करण्यात आले.

उपस्थित सर्व पाहुणे मा.संतोषजी टोकलवाड पोलीस उप-निरिक्षक,डॉ.संघपाल उमरे,संस्थापक अध्यक्ष पो. मि.प.स.समिती,सौ. वनिताताई राऊत सरपंचा देवगाव,डॉ.सलमान शहा नेञतज्ञ,डॉ.सम्यक उमरे फिजियोथेरेपिस्ट,डॉ.प्रफुल्ल मकेश्वर,डॉ.सिमाताई उमरे मनिष गुडधे अमरावती विभागिय प्रमुख,सौरव गावडे,नितिन जैस्वाल,राजेश शर्मा सर ह्या सर्वांचे पोलीस मिञ परिवार समन्वय समिती धामणगाव रेल्वे विभागाच्या वतिने समितीचे सन्मान पञ,फुल झाड देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.सदर सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी बाबारावजी इंगोले, प्रशांत नाईक,सौ. कांचन उके,गजानन कांबळे,निलेश गाडेकर,शुभम ढेबे,पंकज जुमळे,प्रविन बनकर अमोल कोल्हे,आकाश मुन,अनिलभाऊ चौधरी,विजयभाऊ रुपवणे,उमेश दुर्गे,दिपकराव बनकर,सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांनी सहकार्य व मदत केली.सदर उपक्रमाचे पोलीस उप-निरिक्षक संतोषजी टोकलवाड व परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले.