Home उत्तर महाराष्ट्र गोदाकाठच्या वीर बलकवडे पितापुत्रांच्या समाध्यांचे पूजन, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने दसरादिनी गोदाकाठच्या...

गोदाकाठच्या वीर बलकवडे पितापुत्रांच्या समाध्यांचे पूजन, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने दसरादिनी गोदाकाठच्या इतिहासाला उजाळा.

305
नाशिकला पारतंत्र्यातून मुक्त करणारे सरदार वीर बलकवडे पितापुत्रांच्या दुर्लक्षित केवळ नावाला उरलेल्या गोदा तीरावरील समाध्याची फुले वाहून स्मृती जगवताना इतिहास अभ्यासक देवेन्द्र पंड्या,शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,चेतन राजपुरकर, प्रा आनंद बोरा,योगेश कापसे,नाना बच्छाव व अन्य दुर्गसंवर्धक

                नाशिक ( प्रतिनिधी| ) 

          शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने दि. ५ रोजी दसऱ्याच्या नाशिकच्या गोदावरी तीरावर संत गाडगेबाबांच्या मठासमोर असलेल्या, अत्यंत दुरवस्थेत असलेल्या सरदार वीर जयाजी बलकवडे,त्यांचे पुत्र वीर बहिर्जी बलकवडे यांच्या दोन समध्यांची स्वच्छता व समध्यांच हार,फुले वाहून या वीरांच्या स्मृतींना,रस्त्यांच्या काँक्रीटीकरनात केवळ नावालाच उरलेल्या समाध्यांबाबत जागृतता यावी,तसेच या वीरांच्या त्याग बलिदानाची स्मृती निरंतर राहावी यासाठीचा कार्यक्रम इतिहास अभ्यासक,दुर्गसंवर्धक,शिवप्रेमींच्या उपस्थितीत गोदातीरी झाला.यावेळी दोन्ही समाध्यांच अस्तित्व वाचवण्यासाठी यापुढे ही निरंतर प्रयत्न करण्याचा यावेळी उपस्थितांनी संकल्प केला.

 

      अनेक वर्षे पारतंत्र्यात असलेलं नाशिक हे मुघली ठाणे होते,जुन्या नाशिकला तर गढीवर छत्रपती शहाजीराजे,राजमाता जिजाऊ,बाल शिवरायांचे वास्तव्य असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत.१७३८ साली नाशिकच्या गोदाकाठच्या गढी भागात नवाब आजीजखान हा मुघली सरदार स्थानकांवर अत्याचार करीत होता,अश्यावेळी सरदार वीर जयाजी बलकवडे व नवाब अजीजखान यांच्यात झालेल्या युद्धात वीर जयाजी बलकवडे धारातीर्थी पडले,त्यानंतर १४ वर्षांनी १७५२ साली सरदार वीर जयाजी बलकवडे यांचे सुपुत्र बहिर्जी बलकवडे यांनी नाशिकच्या गढी परिसरात जहागीरदार बेग या मुघली सरकारशी युद्ध केले त्यात मुघलांचा दारुण पराभव झाला.व पितापुत्र असलेल्या सरदार बलकवडे वीरांच्या बलिदान व त्यागाने नाशिक पारतंत्र्यातून मुक्त झाले.या पराक्रमाचा विसर झालेल्या नाशिकमध्ये गोदा तीरावर उपेक्षित अवस्थेत असलेल्या वीर बलकवडे पितापुत्रांच्या समध्यांची हेळसांड बघवत नाही.नाशिक महापालिकेने आधीच रस्त्यात दाबलेल्या या ऐतिहासिक समध्यां वर पुन्हा दुसऱ्यांदा काँक्रीट स्टील टाकून रस्ता तयार केला जात आहे,एकूणच हा वीरांच्या पुरातन समध्यांचा इतिहास आता नावालाच उरला आहे.याआधी वारंवार पत्रव्यवहार करूनही स्थानिक महापालिका व पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्षच आहे.मात्र उरल्या सुरल्या समाध्या  वाचवण्यासाठी आता जाणकार इतिहास प्रेमी एकत्रित येऊन ही उपेक्षा थांबवण्यासाठी याठिकाणी उपस्थितांनी संकल्प केला,यावेळी स्थानिक युवकांनी ही आम्ही याकामी सोबत असू असा शब्द दिला.

यावेळी भारतीय इतिहास संकलन समितीचे देवेन्द्र पंड्या,नाणी संशोधक अभ्यासक डॉ चेतन राजपुरकर,नेचर क्लब व  दुर्गसंवर्धन प्रतिष्टानचे संस्थापक आनंद बोरा,शेतकरी संघर्ष संघटनेचे नाना बच्छाव,श्रीराम निकम,मावळा प्रतिष्ठानचे इंद्रजित पाटोळे,उमेश नागरे,मराठा समाज संघटनेचे भूषण काळे,सुमित शर्मा,स्थानिक शिवभक्त रतन पाटील,पंकज रहाणे,शैलेंद्र राठोड, बाळासाहेब राठोड,शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,सचिव योगेश कापसे,श्रमदान समितीचे किरण दांडगे,भूषण औटे,रवी माळेकर,इत्यादी इतिहास क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होते.