Home यवतमाळ देवधरी येथे अतिसाराने दोघांचा मृत्यू; तर 50 च्या वर रुग्णांना अतिसाराची लागण..!

देवधरी येथे अतिसाराने दोघांचा मृत्यू; तर 50 च्या वर रुग्णांना अतिसाराची लागण..!

369

 

अनेक रुग्ण यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

(विशेष प्रतिनिधी / अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे मंजुळा कोंडबाजी राउत (वय ८०) व गयाबाई झिबल बावणे (वय ७०) यांचा अतिसाराने मृत्यू झाला असुन ५० च्या वर रुग्णांना अतिसाराची लागण देवधरी येथे झाली आहे. विशेषतः अनेक रुग्णांना पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर काही रुग्णांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात व यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकिय महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. काही रुग्ण खाजगी इस्पितळात उपचार घेत आहे.
देवधरी येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू होते. मात्र संबंधित कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे विहीरीला तडे गेल्याने दुषित नालीचे पाणी विहिरीत पाझरत असल्याने देवधरी येथे ५० च्या वर रुग्णांना उलटी, हगवन, चक्कर येणे या सारखे आजार सुरु झाले. त्यात देवधरी येथील दोघांचा मृत्यू झाला.
———————————-
BOX… घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे उलटी, शौचालय सह अतिसाराची लागण झाल्याने तेथील वापरात असलेल्या हातपंप व जलस्त्रोतांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
————————————

विशेषतः देवधरी येथील लहान मुलांपासून ते मोठ्या ५० च्या वर रुग्णांना उलटी, शौचालयाचा त्रास सुरु होउन अतिसाराची लागण झाली होती. तसेच अनेक रुग्णांना चक्कर येऊन प्रकृती बिघडल्याने त्यांना पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे रुग्णांवर उपचार केल्या नंतर त्यातील सात रुग्णांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर ईतर रुग्णांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही रुग्णांपैकी सहा रुग्णावर पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. तथापि, देवधरी येथे अनेकांना अतिसाराची लागण झाल्याने घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे आरोग्य विभागाकडुन तपासणी शिबिर (कॅम्प) लावण्यात आले होते. सदर कॅम्पमध्ये अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम यांनी दिली आहे. ईतर रुग्णांवर पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम व त्यांची चमु उपचार करित असुन गंभीर असलेल्या रुग्णांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

BOX… दरम्यान, ॲड. निलेश चवरडोल व पजु कडु यांचेशी संपर्क केला असता, देवधरी येथे १०० चे वर अतिसाराचे रुग्ण असुन अनेक रुग्णांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.