Home यवतमाळ मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला महागावातून शेकडो शिवसैनिक रवाना.

मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला महागावातून शेकडो शिवसैनिक रवाना.

273

( जिल्हयात कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यावर दसरा मेळाव्याची धुरा.)

यवतमाळ :- राज्यातील सत्ता नाट्य नंतर पहिल्यांदाच राज्यसह देशाला शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्याची अनुभूती मिळणार आहे. यातच एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ गर्जनार असून शिवसैनिकांना दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विविध विचारांचे सोनं लुटाया मिळणार असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.
तर इकडे जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षात पडलेल्या उभ्या फुटींमुळे बहुतांश गट कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या गोटात जमला तर उद्धव ठाकरेंकडे मोजकेच निष्ठावान आणि शिवसैनिक शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यातील दोन्ही गटाला आपली ताकद मुंबईच्या मैदानावर दाखवण्याकरिता मोठी जोरकस करावी लागली. बी.के.सी मैदानावर होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्याच्या दसरा मेळाव्याला यवतमाळतून मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात हजारो शिवसैनिक मुंबई कडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून महागाव तालुक्यातील शिंदे गटाचे सक्रिय नेते माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. बी. एन. चव्हाण व माजी नगरसेवक राजु राठोड यांच्या नेतृत्वात आज ६०० शिवसैनिकांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.
शिंदे गटाचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध उपचार मंत्री नामदार संजय राठोड यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधून बारा ते तेरा हजार शिवसैनिक एकूण २६० बसेस मध्ये निघाल्याची माहिती आहे. महागाव तालुक्यामधील मा. जि प सदस्य डॉ. बी. एन. चव्हाण व माजी नगरसेवक राजू राठोड यांच्या नेतृत्वात, रामचंद्र तंबाके, लखन राठोड संदीप पडागळे, पवन राठोड, अर्जुन रनमले, इंदल राठोड, रविंद्र पवार, परमेश्वर जाधव, गजानन चंदनकर, आकाश राठोड, नरेंद्र राठोड, हेमंत शिंदे, गोपाल राठोड, चयन राठोड,अनील घोडे, सोबीन चव्हाण अविनाश जाधव, दिगांबर घोडे यांच्या सहकार्याने महागाव तालुक्यामधून पाचशे ते सहाशे शिवसैनिक रवाना झाल्याची माहिती आहे.