Home जळगाव ४ लाखाची शासकीय मदत त्या मयत शेतमजुराच्या परिवाराला

४ लाखाची शासकीय मदत त्या मयत शेतमजुराच्या परिवाराला

264

मुक्ताईनगर:{आनंद पाटील}
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर उचंदा येथे दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानेमुळे शत्रूघ्न काशिनाथ धनगर हा शेतमजुर जागीच ठार झाला होता.
एका शेत मजूर कुटुंबाला झालेल्या आघाताची आ. चंद्रकांत पाटील यांनी लागलीच दखल घेवून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मयताची वारस पत्नी सुषमा नमायते, मुलगा भावेश, मुलगी वेदिका यांना आ. चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते ४ लाख रुपये धनादेश देऊन शासकीय मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती निधितुन ही मदत देण्यात आली.
याप्रसंगी नायब तहसीलदार निशिकांत वाडे, तलाठी ठाकुर, अनंतराव देशमुख, दिलीप पाटील, सरपंच शशिकला पाटील, छोटु भोई, पंकज पांडव, शेषराव पाटील, ज्ञानेश्वर धनगर, पंडीत धनगर, संजय पाटील, विजय पाटील, योगेश पाटिल, संदिप पाटील आदी उपस्थित होते.