Home यवतमाळ बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस लागले कामाला.

बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस लागले कामाला.

215

( वणीतील मिरवणूक मार्गांवरून पोलिस विभागाचे पथसंचलन.)

यवतमाळ / हरीश कामारकर
सध्या सुरु असलेला गणेश उत्सव उद्या समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूकीच्या लगबगीत आहेत. तर अनेक घरगुती बाप्पाचे विसर्जन ही या मिरवणुकीतून होत असते. या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी वणी उपविभागात, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनखाली तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून काल वणी शहरांतील मिरवणूक मार्गावरून पोलिस विभागाकडून पथसंचलन करण्यात आले.
कोरोना आजारामुळे दोन वर्ष निर्बंध पाळत गणेश उत्सव साजरा करावा लागला होता. त्यावेळी प्रशासनाने मूर्तीच्य उंची सह विविध मर्यादा घालून दिली होती. यंदा मात्र हा गणेशोत्सव निर्बंध मुक्त वातावरणात साजरा करण्यास मुभा मिळाल्याने जिल्हयात मोठया उत्साहात हा गणेश उत्सव पार पडला. ३१ ऑगस्ट सार्वजनिक मंडळाच्या जवळपास दोन हजार तर असंख्य घरगुतीची बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. ढोल ताशा आणि गुलालाच्या उधळणीत विराजमान झालेल्या बाप्पाला आता निरोप द्यायची वेळ जवळ आल्याने प्रशासनाकडून त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. तर या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून हा उत्सव आनंदात साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून कटाक्ष दर्शविण्यात येत आहे.
गत दोन वर्षानंतर जल्लोषात साजरा होत असलेल्या गणेश उत्सवाची उद्या पासुन सांगता होणार आहे. त्यामुळे “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर” च्या घोषात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून जिह्यातील पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. याच अनुषंगाने वणी शहरांत काल उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या नेतृत्वात पोलिस प्रशासनाकडून शहरातील टिळक चौक, आंबेडकर चौक, सरोदय चौक, गांधी चौक व मुख्य बाजारपेठेतून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले,सपोनी माया चाटसे, पो.ऊ. निरिक्षक शिवाजी टिपूर्णे यांच्या सह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी व गृहरक्षक दलाचे सर्व जवान उपस्थित होते…