Home यवतमाळ ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

५० रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

398

 

सिद्धिविनायक प्रतिष्ठान टेंभी व मैत्रीपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास पुढाकार

यवतमाळ / हरीश कामारकर
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समाज उपयोगी उपक्रमांचा वारसा लाभला आहे. लोकमान्य टिळक आणि चालू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा हा वारसा पुढे चालवत विविध सामाजिक उपक्रमाने दरवर्षी तालुक्यात गणेश उत्सव पार पडला जातो.
महागाव तालुक्यातील विविध गणेश उत्सव मंडळ गणेशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करीत असतात यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप निराधार गरजूंना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूची मदत, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा व इतर स्पर्धा ठेवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. गणेश उत्सवाचे औचित्य साधत आज सिद्धिविनायक प्रतिष्ठान टेंभी व मैत्रीपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रुग्णालयाच्या दृष्टीने महागाव तालुक्यातील बरेचसे रुग्ण नांदेड येथील रुग्णालयात जात असतात. यादरम्यान रुग्णांना रक्तासाठयाची गरज भासल्यास, त्या ठिकाणी रक्त उपलब्ध व्हावे याकरिता या मंडळांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरास मंडळाच्या सदस्यासह इतर ५० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५० रक्त दात्यांनी रक्त दान केले. मंडळाचे सदस्य वैभव कवाने,शैलेश मैंद, ऋतिक डाखोले,अनिल कवाने,किशोर कवाने,किरण फटिंग, ओमकार कवाने व मान्यवर मंडळी माजी नगरसेवक राजू भाऊ राठोड व गावकऱ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंग माजी जि. प. सदस्य डॉ. बी एन. चव्हाण, सरपंच तथा तालुका अध्यक्ष सरपंच संघटना अमोल चिकने, मैत्री परिवारचे अभिषेक ठाकूर तर रक्तसंकलनासाठी आलेल्या जिजाई बल्ड सेंटरचे सहसंचालक युवराज पाटील व सहकारी रामेश्वर सुकळकर, जीवन शिरगिरे यांच्या सह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी दिली…