
यवतमाळ / घाटंजी – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशाचे सर्वभौम पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या “तिरंगाध्वज” वरील देश भक्तीच्या आव्हानाला स्विकार करून ७५ व्या अमृत महोत्सवात शेकडो तरूण युवकांनी दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 10.30 वाजता घाटंजी येथील शिव मंदिर, खापरी नाका येथून भव्य तिरंगा बाइक रॅली काढण्यात आले

घाटंजी शहरातील मेन लाइन शिवाजी चौक, यांचेसह तालूक्यातील शिवणी, जरंग, सेवानगर, जरूर, मोवाडा, कोपरा, चोरंबा, खापरी, या गावातून भव्य तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली, भाजपा व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांच्या नेतृत्वात निघालेल्या तिरंगा रॅलीने गांव, शहरात जावून भारत माता की जय.. वंदे मातरम् चा.. नारा देवून हर घर तिरंगा या मोहीमेची जानीव करून दिली, भव्य तिरंगा बाईक रॅली चे आयोजन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर साहेब, माननीय आमदार श्री. मदनभाऊ येरावार, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर माननीय श्री नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आ.संदीपजी धूर्वे यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली, घाटंजी भाजपा तालूका, शहर, युवा मोर्चा,सर्व आघाड़ीचे पदाधिकारी कार्यकर्ते तिरंगा बाइक रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
,











































