Home पश्चिम महाराष्ट्र माळेवाडी येथे मोफत मोतीबिंदु तपासणी…!

माळेवाडी येथे मोफत मोतीबिंदु तपासणी…!

277

पाटील साहेब प्रतिष्ठांनच्या वतीने राबविण्यात शिबीराचा लाभ १२५ रूग्णाने घेतला.


————————–
सुशांत आगे – पुणे
—————————-
आनंद ऋषीजी नेञालय अहमदनगरच्या वतीने मोफत नेञ तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्ञक्रिया शिबीर संस्थापक अध्यक्ष पाटील प्रतिष्ठाण महाराष्ट्र च्या वतीने रामभाऊ नरवडे यांच्या जन्म दिना निमित्ताने राबवण्यात येणार आहे .दिनांक ८ आँगस्ट २०२२ रोजी सकाळी आठ वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिर माळेवाडी येथे मोफत मोतीबिंदु तपासणी शिबीर साजरे करण्यात आले.
माजलगांव तालुक्यातील माळेवाडी ( सुलतानपुर) येथे रामभाऊ नरवडे यांच्या जन्मदिना निमित्ताने नेञ तपासणी शिबीराचे आयोजन डाँ. कैलास नरवडे यांनी आयोजन करून डाँ. गणेश तिडके आनंदऋषीजी नेञालय अहमदनगर यांच्या टिम ने जवळपास १८० रूग्णांची नोंद करण्यात आली असून १२५ रूग्णांची तपासणी केली .या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसींह सोंळके , उदघाटक सुशिल डक , स्वागत जयदत्त नरवडे , अविनाश इंगळे , उमेश गोळेकर , सरपंच संजय नरवडे ,विजयकुमार धिरडे ,विष्णूपंत नरवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.इतर मार्गाने अनावश्यक खर्च न करता गोर गरिबांसाठी दर वर्षी अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून ह्यावर्षी गरजू व्यक्ती साठी अल्पदरात शस्त्रक्रिया करून मोफत नेञ तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे अयोजन करण्यात आले असून या सूवर्ण संधीचा लाभ घेण्यात आला , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष धिरडे , गणेश तौर , श्रीराम निंबाळकर , अकाश नरवडे , ज्ञानेश्वर ढगे , करण थोरात , अजय नरवडे , अजित लोखंडे आणि मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन अँड . शिवाजी निंबाळकर यांनी करून कार्यक्रम संपन्न केला .