नांदेड – (पोलिसवाला ऑनलाईन मिडिया ) बालाजी सिलमवार:- पंचायत समिती पूर्णा कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री माधवराव अडबलवाड साहेब हे नियत वयोमानानुसार आज दि.30 जून 2022 रोजी शासकीय सेवेतून सन्मानाने निवृत्त होत आहेत…
शांत,संयमी,मितभाषी व सहकारी भावना ठेऊन प्रत्येक काम यशस्वी करणारे व्यक्तिमत्व म्हणून श्री अडबलवाड साहेब हे पूर्णा तालुक्यात प्रसिद्ध आहेत…
त्यांच्या कामाबद्दल जनमानसात चांगला लौकिक आहे…
श्री माधवराव अडबलवाड हे मूळचे हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावचे त्यांनी अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीस तोंड देऊन त्यांनी जिवनात अनेकांना योग्य मार्ग दाखवला….
त्यांची दोन मुले आज वैद्यकिय क्षेत्रात यशस्वी डॉक्टर आहेत…
समाजकार्यात नेहमी त्यांचे मोलाचे योगदान असते….
मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळाचे ते कार्यकारीणी सदस्य आहेत… त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी व सुरक्षित जावो….
त्यांना निरोगी आरोग्य लाभो….
श्री माधवराव अडबलवाड साहेब आपणास सेवा निवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!