
आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी (रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही: -एका३० वर्षीय अनोळखी कामगार तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह गांगलगाव येथील रामकृष्ण आश्रमाच्या पाठीमागे १० मे रोजी आढळून आला होता . या प्रकरणात ठाणेदार यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास केला असता चोवीस तासाच्या आत अनोळखी मृत तरुणाचा शोध लावून खून करणाऱ्या आरोपीला अंढेरा पोलिसांना गजाआड करण्यात यश आले .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव येथे गावापासून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या रामकृष्ण आश्रमाच्या पाठीमागील कूपणाच्याबाहेर एका ३० वर्षीय तरुणाचा पेटवून जाळून टाकलेला मृतदेह आढळून आला होता . या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळा वरुण एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते . मात्र संशयित आरोपीच्या सांगण्या वरुण तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली होती त्यामुळे पोलिसांना जळालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी फार त्रास झाला होता . परंतू जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे , एचडीपीओ यामावार , एलसीबीचे ठाणेदार गावंडे यांनी गांगलगाव येथे घटनास्थळी भेट देवून अंढेरा ठाणेदार यांना वेगळ्या भूमिकेने तपास करण्यास सांगितले , त्यामुळे ठाणेदार हिवरकर यांनी ९ ते १० पोलीस कर्मचाऱ्यांची टीप तयार करून तपास हाती घेत सीसीटीव्ही फोटोजद्वारे सूत्रे फिरविण्यात सुरवात केली . आणि तपासामध्ये मृतक शिवाजी बोबडे या नावाच्या व्यक्तीचे बुलढाणा , जालना , अकोला येथे जावून चौकशी केली असता शिवाजी बोबडे या नावाचे १२ व्यक्ती आढळून आले असले तरी यामधून एकाचेही मृतका सोबत सारखे वर्णन जुळले नाही . मात्र अचानक पोकॉ दराडे यांना अकोला वरुण एका शिक्षकांचा फोन आला की या अनोळखी तरुणाला मी ओळखतो असे सांगताच त्यांना सीसीटीव्हीचे फोटोज पाठविले असता त्यांनी सांगितले की हा इसमाची सासुरवाडी किनगाव जट्टू असून तो राहणारा चित्ते गाव औरंगाबाद येथील रहिवासी असून तो सासुरवाडीत राहत होता . पोलिसांनी किनगाव जट्टू येथील मृतकाच्या सासऱ्यांना फोटो दाखविले असता लगेच त्यांनी कबुली दिली की हे माझे जावई आहेत मात्र ते माझ्या मुलीला व त्याच्या दोन मुलांना सोडून गेला आहे . अशी ओळख पटल्याने पोलिसांनी चिखली आणि गांगलगाव येथील सीसीटीव्ही फोटोजची पाहणी केली असता फोटोमध्ये ताब्यात असलेला संशयित आरोपी रहिश शेख व मृतक शिवाजी बोबडे हे दोघे सोबत जातांना येतांना दिसून आले तेव्हा ताब्यातील संशयित आरोपीचा व मृतकाचा फोटो गावकऱ्यांना दाखविला असता सर्वांनी हाच तो अशी ओळख दिली त्यामुळे आरोपीची कसून चौकशी करताच आरोपीने कबूल केले की , आमच्या दोघांच्या बायका सोबत नाहीत , कामासाठी मजूर शोधत असतांना मृतक बोबडे याला कामाची गरज होती म्हणून त्याला कामासाठी गांगलगाव येथील रामकृष्ण आश्रमात आणले गेल्या काही दिवसांपासून सीबत राहणे , दारू पिणे , सोबत झोपणे , गावातील दूकानात उधारी करणे , असे सुरू होते मात्र १० मे रोजी रात्री आम्ही सोबत झोपलो असता रशीद शेख यांने बोबडे सोबत अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न केला असता त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि शेख रशीद याने रागाच्या भरात बोबडेचा गळा दाबून संपविले आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मंदिराच्या पाठीमागे बोबडे याला उचलून कचऱ्यात फेकले आणि संपून जळून खाक होईल या उद्देशाने कचरा पटवून जाळून टाकले होते . अशी कबुली आरोपी याने दिली दुय्यम ठाणेदार वासाडे यांच्या तक्रारी वरून आरोपी रशीद शेख यांच्या विरुद्ध कलम ३०२ , २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .या तपासासाठी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे , पोहेकॉ सिरसाट , झिने , सोनकांबळे , फुसे , पोफळे , राठोड, दराडे , ठाकूर , जाधव , पोहरे , यांनी फार मोठे परिश्रम घेतले .











































