Home वाशिम मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजारमध्ये जावयाकडुन दुहेरी हत्याकांड,सासु व मेहुणीवर कोयत्याने वार

मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजारमध्ये जावयाकडुन दुहेरी हत्याकांड,सासु व मेहुणीवर कोयत्याने वार

1091

 

वाशिम:-सासरवाडीला जावुन जावयाने बायकोच्या माहेरच्या मंडळीची हत्या केल्याचा प्रकार ऊघडकीस आला आहे.सासुबाई आणी मोठ्या मेहुणीवर जावयाने कोयत्याने जीवघेणा केल्याचा आरोप आहे.वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार इथे ही अंगाचा थरकाप ऊडवणारी घटना समोर आली आहे.जावयाने सासुबाई आणी मेहुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात दोघींनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.निर्मला पवार आणी विजया गुंजावळे अशी मयत महिलांची नावे आहेत.१३ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ ऊडाली आहे.


शेलुबाजार येथे झालेली खळबळजनक घटना संपत्तिच्या वादातुन ही दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.घटनेची माहीती मिळताच ऊपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनिल हूड आणी पिएसआय मंजुषा मोरे यांनी पोलिसताफ्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.तसेच याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी तपास करुन आरोपी पळुन जात असतांना मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले आहे.यावेळी ठाणेदार सुनिल हुड,एपीआय मंजुषा मोरे,भगत,मस्के,ज्ञानेश्वर राठोड,गोपाल कव्हर,संदिप खडसे आदी पोलिस शिपाई होते.

*संपत्तीच्या वादातुन हत्या झाल्याचा संशय*
सासरवाडीला जावुन जावयाने बायकोच्या माहेरच्या मंडळींची हत्या केल्याचा प्रकार मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे ऊघडकीस आला आहे.सासुबाई आणी मेहुणीवर जावयाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे ही अंगाला थरकाप ऊडवणारी घटना घडली असुन यामध्ये दोघींचाही मृत्यु झाला आहे.संपत्तीच्या वादातुन निर्मला पवार आणी विजया गुंजावळे या मायलेकीची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असुन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206