Home विदर्भ डॉ रिपल राणे यांचा नागरी सत्कार संपन्न , “विविध सामाजिक संघटनांनी केले...

डॉ रिपल राणे यांचा नागरी सत्कार संपन्न , “विविध सामाजिक संघटनांनी केले अभिनंदन”

329

डॉ राणेंच्या रुपात तालुकास्तरीय क्लबला पहील्यांदाच मिळाली संधी


रविन्द्र साखरे

आर्वी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तथा शहरातील एनएबिएच मान्यताप्राप्त राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ रिपल राणे यांची लायन्स प्रांत ३२३४एच १ च्या द्वितीय उपप्रांतपाल पदी निवड झाल्याबद्दल शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या मान्यवर प्रतिनिधींच्या उपस्थितीत आर्वी लायन्स क्लबच्या वतीने त्यांचा नुकताच सपत्निक सत्कार करण्यात आला.
आयनॉक्स हॉल आर्वी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अरुणजी पावडे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वक्ते प्रा डॉ नारायण निकम व मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जोशी यांची व लायन्सच्या रिजन चेअरपर्सन डॉ कालिंदी राणे , झोन चेअरपर्सन प्रा डॉ दीपक चव्हाण ,वर्तमान अध्यक्ष ला नितीन वानखडे यांची उपस्थिती होती.
दीप प्रज्वलन व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवर अतिथींनी आपले अभिनंदन व शुभेच्छापर मनोगत व्यक्त केल्यानंतर सत्कारमूर्ती डॉ रिपल राणे (एमजेएफ)यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी डॉ राणे यांचे माता पिता सौ कविताताई व श्री रमेशराव राणे यांचा देखील क्लबच्या वतीने ह्रुद्य सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटना ,पत्रकार संघटना, लायन्स क्लब आर्वी सेवा ,रोटरी क्लब ,रेड क्रॉस इत्यादि व या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असणारे त्यांचे आप्तस्वकीय, हितचिंतक ,मित्रपरिवार यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर राणे यांनी त्यांना मिळालेल्या या पदाच्या जबाबदारीची आपल्याला जाणीव असल्याचे सांगून भविष्यात या पदाच्या माध्यमातून सामाजिक सेवा क्षेत्रातील आपले कार्य अधिक जोमाने करत राहणार असल्याचे तसेच आंतरराष्ट्रीय लायनच्या सहकार्याने लायन्स प्रांत ३२३४एच१ व आर्वी परिसरात कायमस्वरूपी सेवा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला व सत्कारा बद्दल सर्वांचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली. नुकत्याच नागपूर येथील ली – मेरिडियन हॉटेल येथे पार पडलेल्या परिसंवादा मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ राणे यांचा प्रचंड मताने विजय झाला, म्हणून डॉ राणेंच्या रूपाने तालुका स्थरावरील क्लबला संपूर्ण महाराष्ट्रातून पहील्यांदाच ही संधी मिळाली आहे हे विशेष.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्वी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष प्रा डॉ मोरेश्वर देशमुख यांनी तर संचालन कोषाध्यक्ष ला. प्रमोद नागरे यांनी केले. उपस्थितांचे आभार ला. नितीन वानखेडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर चे सदस्य ला प्रा सुमंत देशमुख यांच्या नियोजनात आर्वी लायन्स व लिओ क्लब चे सर्व सदस्य, राणे हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.