
रवींद्र साखरे
आर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष श्री नितीन आष्टीकर यांच्या प्रयत्नांना यश दि.१८/४/२०२२ ला उपविभागीय अधिकारी श्री हरीषजी धार्मीक साहेब यांना निवेदन देण्यांत आले होते.
इंदीरा चौक लाकूड बाजारातील जयस्तंभाच्या चहूबाजूने भंगार व कचऱ्याचे साफसफाई करण्याबाबत निवेदन देऊन लक्ष केंद्रीत करण्यांत आले होते. या निवेदनात जयस्तभांला लागून असलेल्या वडाच्या झाडाला पूजन व दिवे तसेच प्रदक्षिणा लावण्यास जागा शिल्लक नसल्यामुळे परिसरातील रहीवासी महीला व इतर लोकांना यांचा फार त्रास सहन करावा लागत होता.
जयस्तंभाला लागून वडाचे झाड असल्यामुळे रोज दिवा लावायला व पुजन आणि वडसावित्रीला पौर्णिमेला पूजन करण्यास मोठ्या प्रमाणात महीला येत असे. पण चहूबाजूने भंगार व कचरा जमा असल्यामुळे पूजन तसेच प्रदक्षिणा घालू शकत नव्हत्या.
तरी जयस्तंभा जवळील भंगार व कचरा साफ केल्यास देशातील हुताम्यांना ही खरी श्रध्दांजली होईल तसेच जयस्तंभाचा शहीदांचा अपमान सुध्दा होणार नाही असे निवेदनात नमूद केले होते. निवेदनाची प्रतिलीपी मुख्याध्याधिकारी नगर परिषद आर्वी, मा.श्री रामदासजी तडस साहेब खासदार वर्धा, व मा.श्री दादारावजी केचे आमदार, आर्वी तसेच श्री गोपालभाऊ मरस्कोल्हे आर्वी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी यांना निवेदन देण्यांत आले होते. निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री संजय देशमुख, रवी घुगरे, विलास ठाकरे, सुनिल इखार, रऊफ खान व महादेव गिरडे आदी कार्यकर्ता उपस्थित होते. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निवेदनाची दखल घेऊन केलेल्या साफसफाई बद्दल अधिकारी हरीश धार्मिक व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले











































