Home मराठवाडा विद्युत तारांच्या घर्षणाने ऊस व मोसंबी झाडे यांनी पेट घेतल्याने लाखोंचे नुकसान…

विद्युत तारांच्या घर्षणाने ऊस व मोसंबी झाडे यांनी पेट घेतल्याने लाखोंचे नुकसान…

433

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री शिवारातील गट नं.९० मध्ये हार्वेस्टरने उसतोड सुरू असताना विदयुत तारांची पार्किंग होऊन १८० मोसंबी झाडे व अडीच ऐकर उस जळून खाक झाला.तर तेथे सुरू असलेले हार्वेस्टर लोकांनी ताबडतोब प्रयत्न करुन बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळल्याची घटना आज दुपारी घडली.

वडीगोद्री येथे शेतकरी सुनील सोमनाथ मोराळे गट नंबर ९० मध्ये क्षेत्र ५  ऐकर हार्वेस्टरने ऊस तोडणी सुरू आहे.यापैकी ३० टक्के उस उभा होता.ऊन्हाचा पारा अधिक असल्याने हार्वेस्टर मध्यभागी शेतात उभा केले होते.आज दिवसभर सोसाट्याचा वारा होता.त्या वाऱ्याने तारांचे एकमेकांचे घर्षण होऊन तुटलेल्या ऊसाच्या पाचटयाने पेट घेऊन बघता बघता तारांच्या ठिणगीने हार्वेस्टरला वेढा घातला.परंतु आसपास शेतकऱ्यांना ट्रँक्टर रोटाने हार्वेस्टरला पडलेल्या वेढा विझण्यात यश आल्याने सुदैवाने मोठी हानी टळल्याचे हार्वेस्टर मालक बाबुराव मिसाळ यांनी सांगितले.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे हातातोंडाशी आलेला शेतमाल जात आहे.शेतकरी रामराव लक्ष्मण सुरासे यांचा गट नंबर ९० मधील ३ वर्षाचे फळाला मोसंबीचे १८० मोसंबी झाडे जळाले.तर ३ फळे असलेले आंब्याची झाडे १ रामफळ जळून खाक होऊन मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहे.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या फळबाग व उसाचा पंचनामा केला आहे.