Home यवतमाळ उद्योग भवन यवतमाळ स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

उद्योग भवन यवतमाळ स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

536

यवतमाळ(प्रतिनिधी):- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)यवतमाळ द्वारा आयोजित सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींकरिता स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि . २५/०४/२०२२ ते २९/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे .
सदर प्रशिक्षणात जिल्ह्यातील उद्योग संधी, उद्योजकीय गुणसंपदा,उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास ,सुसंवाद कौशल्य ,उद्योग संधी निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे ,तसेच कृषीवर आधारित उद्योग जसे शेळीपालन,कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय बाबत मार्गदर्शन करण्यात येईल त्याचप्रमाणे विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती व उद्योग उभारणीविषयक मार्गदर्शन अधिकारी व तज्ञाद्वारे करण्यात येईल . तरि इच्छुक युवक युवती ,महिला व पुरुषांनी अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी दि . २३/०४/२०२२ पर्यंत प्रकल्प अधिकारी एमसीईडी उद्योग भवन दारव्हा रोड यवतमाळ मो. ८२७५०९३२३० येथे संपर्क साधावा.