Home यवतमाळ कै. पृथ्वीगिर हरिगिर गिरी आद्यपत्रकार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार

कै. पृथ्वीगिर हरिगिर गिरी आद्यपत्रकार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार

188

 

यवतमाळ  – सोमवार दि.१४ मार्च २०२२ ला कै. पृथ्वीगिर हरिगिर गिरी ( गोस्वामी ) आद्यपत्रकार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. तरी सर्व समाजबांधव, समाज भगिनींनी सकाळी ०९.३० वाजता त्यांचे समाधीस्थळी,गिरी नगर (स्टेटबँक चौक ते वाघापूर रोड यवतमाळ) येथे बहुसंख्येने,सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती.या कार्यक्रमास नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती कांचनताई चौधरी, नगर परिषद यवतमाळ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती माधुरी मडावी,जेष्ठ पत्रकार श्री.पद्माकर मलकापुरे व गोसावी समाजातील जेष्ठ नेते माजी प्राचार्य आयुर्वेदिक कॉलेज यवतमाळ डॉ.श्री.अशोक गिरी प्रामुख्यानेउपस्थित राहणार आहे.तरी पुन्हा विनंती की सर्वांनी सहपरिवार वेळेवर उपस्थित राहावे.