Home विदर्भ रस्त्याने जाताना नागरिक त्रस्त प्रशासन झोपेचं सोंग घेऊन सुस्त

रस्त्याने जाताना नागरिक त्रस्त प्रशासन झोपेचं सोंग घेऊन सुस्त

181

 

धामणगांव रेल्वे – प्रशांत नाईक

अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील एक छोटास गाव गिरोली काही वर्षांपूर्वी अनोळखी असलेलं व राष्ट्रपती निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाल्याने नाव लौकिक झाल्याने या गावाची ओळख एक आदर्श ग्राम म्हणून तालुक्यात झाली.
परंतु अजूनही काही सुखसोयी पासून हे गाव वंचितच या गावात अजून महाराष्ट्र शासनाची लालपरी पोहचली नाही.
तस हे गाव अमरावती जिल्ह्यात पण याची मुख्य बाजारपेठ,, बँक, शाळा, दवाखाना, सर्व जीवनावश्यक सामान घ्यायला जावं लागते वर्धा जिल्ह्यात नदीपलीकडे पुलगाव ला त्यामुळे गिरोली या गावातून पुलगाव ला जाणाऱ्या एकमेव रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.मुख्य म्हणजे विध्यार्थ्यांना आपलं संपूर्ण शिक्षण, कलाससेस करीता मिळेल त्या साधनाने याच रस्त्याने येणे -जाणे करावे लागते.

याच रस्त्यावर दिवसरात्र गाव वासियांना, शेतकरी यांना शेतात जाण्यासाठी चालावं लागाते,आपल्या संसाराचा गाडा चालवीण्याकरिता मजूर वर्ग याच रस्त्याने रात्री बे रात्री पुलगाव येथे येजा करतो.
रस्ता पूर्णपणे उखळला असून मोठं मोठे दगड गिट्टी रस्त्यावर उघडी पडली आहे.त्यामुळे छोटे मोठे अपघात या मार्गाने नेहमीच होतं राहतात.
सदर मार्गाची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास याचं रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या गिरोली -पुलगाव एकमेव असलेल्या मार्गाची दुरस्ती किंवा नूतनीकरण लवकरात लवकर करण्याची गावाकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.