Home यवतमाळ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागतिक महिला दिन साजरा..!

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागतिक महिला दिन साजरा..!

439

 

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – आधुनिक युगातील सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी मिळवली असुन या युगातील आवाहने महिला सक्षमपणे स्वीकारुन पार पाडत आहे. समाज घडविण्यात त्याच बरोबर राष्ट्राच्या विकासात महिलांचा पुरुषाच्या बरोबरीने वाटा असुन कुटुंब विकासात महिलांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश फरहाना तबस्सुम शेख यांनी केले. त्या घाटंजी न्यायालयात आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बोलत होत्या. या वेळी न्यायाधीश फरहाना तबस्सुम शेख यांनी न्यायालयातील कर्मचारी, महीला वकील आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी तालुका वकील संघाने सचिव अँड. सादीक खान यांनी केले.

या प्रसंगी घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. अनंतकुमार पांडे, सहाय्यक सरकारी वकील अँड. प्रिती इंगळे व अँड. अनुपमा दाते आदींचे समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला अँड. रागिणी राउत, अँड. योगिता पवार, सौ. स्वाती अनंतकुमार पांडे आदींची उपस्थिती होती. आभार अँड. सादीक खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाझर ढलवार, काँपींग लिपीक वाघाडे, लिपीक तुरकर आदींनी परिश्रम घेतले.