
जालना-लक्ष्मण बिलोरे
युक्रेन मध्ये उजरोड नॅशनल युर्निसीटी मध्ये एम.बी.बी.एस.प्रथम वर्षामध्ये जालना शहरातील संभाजीनगर भागातील विद्यार्थी तेजस गणेश पंडीत हे शिक्षण घेत असतांना तेथे युध्दजन्य परिस्थीती निर्माण झाल्यामुळे त्याला भारताचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातुन जालना येथे परत आल्यानंतर त्यांच्या संभाजीनगर जालना येथील निवास्थांनी जावून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास देशमुख,भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब पाटील कोलते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, रवी कायंदे, कृष्णा जाधव,किशोर पाखरे यांच्यासह तेजस पंडीत यांची आई तारा पंडीत व वडील गणेश पंडीत उपस्थीत हेाते.
भारत सरकारच्या प्रयत्नामुळे भारतात सुखरुप पोहचल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नामुळेच मी युक्रेन मधून जालना मध्ये लवकर पोहचल्याचे मत तेजस गणेश पंडीत यांनी बोलतांना व्यक्त केले.











































