Home यवतमाळ पदोन्नती करीता अंगणवाडी मदतनीस यांचे यवतमाळ जि.प. समोर आमरण उपोषण सुरू

पदोन्नती करीता अंगणवाडी मदतनीस यांचे यवतमाळ जि.प. समोर आमरण उपोषण सुरू

449

 

यवतमाळ जिल्हा परिषद समोर सौ.रजिता नितीन डोळसकर , अंगणवाडी मदतनीस,रा.वांजरी ता.पांढरकवडा जि.यवतमाळ ह्या आज दि.१०-०३-२०२२ रोजी ११ वाजता पासुन यवतमाळ जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यात यावी म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे. सन २०१६ पासुन वांजीरी येथे अंगणवाडी शेवीका पदाची जागा रिक्त असुन पात्र अंगणवाडी मदतनीसला पदोन्नती देण्यात यावी असा शासन निर्णय १३ आँगस्ट १४ असुन सुद्धा सन २०१६ पासुन आजपर्यंत पदोन्नती देण्यात आली नाही सौ.रजिता डोळसकर ह्या १२ वी उत्तीर्ण असुन मदतनीस आहे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना वारंवार विनंती करून सुद्धा आजपर्यंत पदोन्नती देण्यात आली नाही शेवटी अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) च्या नेतृत्वात आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे जि.प. प्रशासन शासन निर्णयानुसार पदोन्नती का देत नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शासन निर्णययाची काटेकोर अंमलबजावणी करून ताबडतोब पदोन्नती देण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा निवेदनाद्वारे आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन राज्य कौन्सिल सदस्य रचना जाधव अध्यक्ष सविता कट्यालमल जिल्हा सचिव गया सावळकर रमा गजभार सुजाता चिंतकुटल्लावार मिरा जिड्डेवार ममता मांडेकर दिला आहे