Home नांदेड राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

499

 

प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट,दि : ०८ :- तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आज येथील काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष व्यंकटराव नेमानी वार यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून या निमित्त केक कापून महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला
या कार्यक्रमास किनवट तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला तालुकाध्यक्षा शेख शहनाज शेख शमु, युवा नेते गिरीश नेमानीवार, जिल्हा उपाध्यक्ष वसंत राठोड, नगरसेवक तथा काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष अभय महाजन, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोन पल्लीवार, बाजार समितीचे संचालक सत्तार खीची, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रीती मुनेश्वर अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई नगराळे, जयश्री भरणे, दैनिक मराठवाडा केसरीच्या तालुका प्रतिनिधी परवीन शेख, वंदना गादेकर, माया हनवते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
प्रारंभी देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार यांच्या हस्ते केक कापून महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जयश्री भरणे म्हणाल्या की काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लडकी हु लढ सकती हु! असा नारा देऊन महिलांमध्ये चेतना निर्माण केली देशाला खऱ्या अर्थाने सक्षम बनविण्यासाठी महिला नेतृत्वाची गरज आहे. पक्ष कार्याबरोबरच आम्ही महिलावर होणार्‍या अन्याय अत्याचाराविरोधात सदैव लढा देत राहू
यानिमित्त पत्रकारिता, सामाजिक कार्य, अल्पसंख्यांक, आदिवासी व मागासवर्गीय समाजात निष्पक्ष भावनेने जनजागृती करून उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल शेख परवीन, शेख शहनाज, जयश्री भरणे, माया हनवते, वंदना गादेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच केक भरऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते