Home नांदेड माहूर येथे “उत्सव स्त्री जाणिवांचा” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 170 महिला...

माहूर येथे “उत्सव स्त्री जाणिवांचा” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 170 महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.

452

 

प्रतिनिधी : मजहर शेख,

सर्व महिला अधिकारी व सर्व महिला कर्मचारी यांची तज्ञ डॉक्टरांकडून एकूण 170 महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी.

नांदेड/माहूर, दि:-05 :- जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने माननीय श्रीमती वर्षाताई ठाकूर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, माननीय डॉ. बालाजी शिंदे सर जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड, माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर युवराज मेहेत्रे सर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार सर यांच्या संकल्पनेतून तसेच प्रयत्नातून आरोग्य विभाग पंचायत समिती माहूर येथे “उत्सव स्त्री जाणिवांचा” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माहूर तालुक्यातील सर्व महिला अधिकारी व सर्व महिला कर्मचारी यांची तज्ञ डॉक्टरांकडून एकूण 170 महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार सर यांनी तर सूत्रसंचलन पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस.गावंडे यांनी केले, उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन ईश्वर राठोड यांनी केले.सदर शिबिरात हृदयरोग तज्ञ व मधुमेह तज्ञ डॉ.नकुल कदम सर पुसद,नेत्ररोग तज्ञ डॉ.उमेश रेवनवार,डॉ. विनीत रेवनवार पुसद,बाल रोग तज्ञ डॉ. वैजनाथ साठे सर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शोभना निकम मॅडम आर्णी जिल्हा यवतमाळ यांच्याकडून करण्यात आली कार्यक्रमाचा शुभारंभ मासाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच फित(रिबीन) कापून पंचायत समिती सभापती सौ.अनिताताई विश्‍वनाथरावजी कदम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाला नांदेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य समाधानजी जाधव,जि.प.सदस्य संजयभाऊ राठोड,पंचायत समिती उपसभापती उमेशजी जाधव,पंचायत समिती सदस्य नामदेवरावजी कातले, पंचायत समिती सदस्य नीलाबाई राठोड,औरंगाबाद सहाय्यक आयुक्त (रोहयो) माननीय राजेंद्रजी अहिरे सर, नांदेड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.चौधरी सर,माहूर पंचायत समिती गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार सर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास टारफे सर, डॉ.श्रीनिवास हूलसुरे सर,डॉ.संदेश राठोड सर,डॉ.स्वाती केंद्रे मॅडम डॉ.पंकज नरवाडे सर, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.वैभव लहाने,डॉ.दीपक गरकल, डॉ.अमोल बुरसे, डॉ.स्वीटी भोयर,डॉ.सुजाता मंदाडे,डॉ.वेंकटेश डांगे,डॉ.गजानन भोयर, औषध निर्माण अधिकारी संदेश बेहेरे, नितीन चिकणे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मण जोगपेठे,आरोग्य सहाय्यक डि.के.जोशी,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका आरोग्य सहाय्यक एस.आर.जोगपेठे,बी.सी.एम.श्रीमती दीपिकाताई तीरमनवार,कार्यक्रम सहाय्यक ईश्वर राठोड,वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक देवराव झाडे,लेखापाल एन.जी.वट्टमवार,लेप्रसी टेक्निशियन ऋतुजा राजू जगताप,परिचर श्रीमती एस.जी.भारती,तालुक्यातील महिला अधिकारी, महिला शिक्षका,महिला ग्रामसेवक, सर्व अंगणवाडी वर्कर,महिला कर्मचारी, आरोग्य कर्मचारी (स्त्री-पुरुष) तसेच महिला परिचर इत्यादी उपस्थित होते.