
जालना- लक्ष्मण बिलोरे
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाचे कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे.राष्ट्र बलशाली,महासत्ता करायचे असेल,जगावर भारत देशाचे साम्राज आणायचे असेल तर ब्रह्माकुमारीज चे जिथे जिथे कार्यक्रम असतील त्यामध्यें सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री, परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

सातोना खुर्द येथे भारतिय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शाखेचा दुसरा वर्धापन दिन यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात श्री लोणीकर बोलत होते याप्रसंगी परभणी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते,पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते,सरपंच विलास आकात,मा.सरपंच परमेश्वर आकात,यश अर्बन बैकचे अध्यक्ष बाळासाहेब आकात ,कल्याण महाराज,ब्रह्मकुमारी अर्चना दिदी परभणी,सुमन दिदी जिंतूर,शांता दिदी पाथरी,रेखा दिदी परतुर,अनिता दिदी मानवत,सविती दिदी सेलू,शिल्पा दिदी आष्टी,वैशाली दिदी वालूर,दिपा दिदी कुंभार पिंपळगाव,सिमा दिदी यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी,परमपिता शिव परमात्मा यांच्या स्मृतीत राहून दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.स्वागत गीतानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.सातोना खुर्द येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या द्वितिय वर्धापनदिनानिमित्त प्रमुख उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले कि, आपण प्रत्येक देवस्थानला सभामंडप दिले कोट्यावधींची कामे केली.काहीतरी अपेक्षा ठेवूनच कार्यरक्रमाचे आयोजक आम्हाला बोलवत असतात. परंतु ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बहेनजींनी कधीच काही मागणी केली नाही. परंतु ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालयातील कुठलेही काम निघाले तर मी दहा ते पंधरा लाखापर्यंत निश्चितच मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यानंतर भावनाताई नखाते यांनीही ब्रह्माकुमारीज च्या सहवासातील अनुभव सांगितले. पाथरी येथे या ईश्वरीय विश्व विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यरक्रमात दिपा दिदी यांनी सुत्रसंचालन केले तर सिमा दिदी ,दिपाली दिदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.











































