
विनोद पञे
यवतमाळ – स्थानीक विठ्ठलवाडी भाग क्रं. ३ , परिसरात असलेल्या मंदिरात अचानक भाविकांची मोठी गर्दी जमा झाली. या मंदिरातील नंदी पाणी पीत असल्याची चर्चा क्षणार्धात वंजारी फैल , पिंपळगाव सह सर्वञ पसरली. त्यानंतर भाविकांनी पाणी घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला पाणी पाजण्यासाठी मंदिरात मोठी रांग लावली आपला नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी पाजण्यासाठी पुढे जात होते त्या सोबत मी व माझे मिञ सुध्दा उपस्थित होतो. ही संपूर्ण घटना पाहण्यासाठी लगतच्या लोकांनी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.











































