Home विदर्भ भातकुली नगर पंचायत दुसऱ्यांदा युवा स्वाभिमान पक्षाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद राखण्यात यश

भातकुली नगर पंचायत दुसऱ्यांदा युवा स्वाभिमान पक्षाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद राखण्यात यश

166

 

प्रतिनिधि -: धनराज खर्चान

अमरावती / भातकुली-: भातकुली नगर पंचायतच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडनूक सोमवारी १४ फेब्रूवारी कोनताही अनूचित प्रकार न घड़ता भातकुली नगर पंचायतीच्या इमारतित निवडनुक अधिकारी रणजीत भोसले यांच्या उपस्थितित शांततेत पार पड़ली.युवा स्वाभिमान पक्षाच्या योगिता कोलटेके यानी अपेक्षेप्रमाने नगराध्यक्षपदी विजय मिडविला, तर उपाध्यक्षपदी युवा स्वाभिमान पक्षाचे प्रतीक कंडलकर हे विजयी झाले. नगराध्यक्षाच्या निवडनुकित तीन महिला उमेदवार तर उपाध्यक्षाच्या निवडनुकितही तीन उमेदवारानी अर्ज दखल केले होते, नगरा ध्यक्षपदी निवड झालेल्या योगिता कोलटेके याना ९ मते मिडाली तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या स्वाति बुध यांना ५ मते भाजपच्या शिल्पा राठी यांना ३ मते मिडाली, उपाध्यक्षाच्या निवडनुकित युवा स्वाभिमान पक्षाचे प्रतीक कांडलकर यांना ९ मते मिडाली, त्याचे प्रतिस्पर्धी अंकुश पवार यांना ५मते व भाजपाच्या अंजुम सद्दाम यांना ३ मते मिडाली.निवडनूक अधिकारी रणजीत भोसले यांनी विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली, व त्यांना पुष्पगुच्छ देवुन त्यांचे अभिनंदन केले.यावेडी नगरपचायतिच्या मुख्यधिकारी करिश्मा वैद्य मैडम उपस्थित होत्या ,युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेता पुरुषोत्तम खर्चान, अध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवक कार्यालय बाहेर येताच युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची आतशबाजी करत जल्लोष केला ,अनेकानी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे हार घालून व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
यावेडी युवा स्वाभिमान पक्षाचे कार्याध्यक्ष सुनील राणा ,पक्षाचे गटनेता पुरुषोत्तम खर्चान उपस्थित होते.