
दारव्हा (प्रतिनिधी):- शहरासह तालुक्यात सध्या चहूबाजूंनी रोड रस्त्याचे काम सुरू असून मागील एक दोन वर्षापासून दारव्हा डोल्हारी मार्गे नेर रोड रस्त्याचे व पुलाचे तसेच डांबरीकरणाचे काम ईगल इंफा.कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे परंतु ते अत्यंत मंदगतीने सुरू आहे.

दारव्हा ते नेर या रस्त्याचे अंतर जेमतेम पंचवीस किलो मिटर असून त्यामधील शहापूर ते नेर रोडचे डांबरीकरणाचे काम सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहा पर्यंत पूर्ण झाले परंतु दारव्हा ते डोल्हारी हा तेरा किलो मिटर अंतराच्या ररस्त्यात सात पुलाचे बांधकाम सुरू असून त्यापैकी दोन अर्धवट तर गनेशपुर जवळ बांधकाम सुरू असलेल्या पुलामध्ये फुटलेले व जुने पाईप टाकून काम करण्यात आले असून इतर वाढीव पुलाचे बांधकाम सुरू असताना त्यापुलाच्या आजूबाजूला कुठेही *”पुलाचे बांधकाम सुरू आहे. वाहने हळू चालवा.”* असे फलक कुठेही दिसून येत नाही.तर कुठेही रेडियम लावलेले दिशादर्शक फलक किंवा वळण रस्ता वापरा असे फलक लावण्यात आल्याचे दिसून येत नाही.यामुळे रात्री अपरात्री वाहतुकीस वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे परिणामी अपघाताचा सुद्धा सामना करावा लागत असून अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहे तर दिवसा मात्र रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत असून धुळीच्या कणामुळे रोड लगतच्या गावकऱ्यांना श्वसनाचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर ठिकठिकाणी वन विभागाच्या वतीने काम करण्यास मनाई करण्यात आल्याचे कारण दाखवून कंत्राटदार कंपनी वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यात पडलेले खड्डे बुजवूत नसल्यामुळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहे समजत नाही.

तेरा किलो मीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण व पुलाच्या बांधकामाला एक एक दोन दोन वर्ष लागत असतील मंदगतीने होणाऱ्या बांधकामांकडे शासन प्रशासनाचे लक्ष आहे? एकीकडे मागील काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासूर्णे या तीस किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इंफाकॉनने एकदिवसात काम पूर्ण करून लिम्का बुक मध्ये नाव नोंदविले असे समजते.परंतु दारव्हा ते डोल्हारी या पुलाचे व रोडच्या डांबरीकरणाचे काम लवकर न करणाऱ्या ईगल इन्फा कंपनीला व लोकप्रतिनिधींना *” बेशरम बुक ऑफ रेकॉर्ड”* हा पुरस्कार देण्यात यावा ? असे या रोड रस्त्या लगत असलेल्या पारधी तांडा (गनेशपुर २), गनेशपुर, पेकर्डा, शेन्द्री बू!!, डोल्हारी येथील नागरिकांचे म्हणणे आहे.तर रोड रस्त्याच्या कामाकडे शासन प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यास व दारव्हा ते डोल्हारी या तेरा किलो मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकर न केल्यास नागरिकांना सोबत घेऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.असे मा. बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.











































