
देवानंद जाधव
ता. यवतमाळ, जि. यवतमाळ. दिनांक:- 11 फेब्रुवारी 2022 रोजी एनजीओ नीट फाऊंडेशन यांच्या वतीने भांबराजा गावी डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला. माहिती व आयोजन नीट फाऊंडेशन चे राजेंद्र कावळे साहेब यांनी केले. त्यांनी बँकेचे व्यवहार, सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, इन्शुरन्स, ए.टी.एम चा वापर, अर्थिक फसवणूक, फेक कॉल्स केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनतेमधे अर्थिक व्यवहार कसे असले पाहिजे व डिजिटल तंत्रद्यान तसेच चांगल्या पैशाचे व्यवस्थापन या विषयी जनजागृति करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अर्थिक सौजन्य फिनकेअर बँक चे लाभले, याप्रसंगी फिनकेअर बँके चे सीएसआर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ वार्डेकर साहेब उपस्थित होते. यावेळी गावातील जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत सहभाग प्रमाणपत्र चे वाटप देखील करण्यात आले.











































