
अमरावती – धामणगांव रेल्वे तहसील कार्यालयाजवळ चालू असलेल्या शेतकरी मानकर कुटुंबाचा उपोषणाचा आजचा 12वा दिवस तरीही प्रशासना कडून अजून पर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

उपोषण कर्ते मानकर दम्पतंय आपल्या मागणी वर ठाम असून जोपर्यंत मागणी पूर्ण होतं नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही. त्यामध्ये आमचा जीव जरी गेला तरी पर्वा नाही अशी माहिती उपोषण कर्त्या शेतकरी मानकर यांनी दिली.
आम्हाला योग्य न्याय मिळेपर्यंत आमचं उपोषण चालू राहिलं व मि माझ्या पतिसोबत शेवट पर्यंत साथ राहिलं.प्रशासन आमच्या जीवाशी खेळ करत आहे. व जोपर्यंत आमच्या शेतीला वहीवाटी करीता रस्ता मिळत नाही तोपर्यंत आमला मरण जरी आले तरी चालेल पण उपोषण मागे घेणार नाही.12दिवस लोटून सुद्धा गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही कुठे न्याय मागावा अशी कडवी प्रतिक्रिया आपल्या पती समवेत उपोषणला बसलेल्या सौ मानकर यांनी आपल्या प्रतिनिधी ला दिली.
उपोषणास बसलेल्या मानकर दाम्पत्या ची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून त्यांच्या जीवितास कमी जास्त झाल्यास यांस पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार अशी प्रतिक्रिया उपोषणास बसलेल्या मानकर यांच्या विवाहित मुलींनी दिली आहे.
आज उपोषणाच्या 12व्या दिवशी शेतकरी संघटनेचे नेते . ऍड चेतन परडखे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असून प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन उपोषण कर्त्यांना न्याय द्यावा.










































