
मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी साकला

प्रतिनिधी:-[ रवि आण्णा जाधव]
देऊळगावराजा :- आज रोजी पत्रकारांवर अन्याय व अत्याचार केल्या जात आह. त्याचे कारण पत्रकारां मध्ये एकजुटता कुठे तरी कमी झालेली दिसून येत आहे. परंतु पत्रकारांना आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची एकजुटता दाखविण्याची गरज आहे. पत्रकार संघटना कितीही असो परंतु पत्रकार हा एकच आहे. त्याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे यांनी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यास केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे राज्य उपाध्यक्ष तथा राज्यस्तरीय पत्र तपस्वी पुरस्कार प्राप्त राजेंद्रजी काळे हे होते. यावेळी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पदी प्रकाशचंद साकला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
दि.३० जानेवारी रोजी स्थानिक मातृतीर्थ सभागृहात बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी बर्दे तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबईचे राज्य उपाध्यक्ष तथा राज्यस्तरीय पत्र तपस्वी पुरस्कार प्राप्त राजेंद्रजी काळे यांचा सन्मान सोहळा मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यकमाचे प्रमुख पाहूणे म्हणून, प्रदेश प्रतिनिधी गजाननजी धांडे, राजेशजी डिघोळकर, दिपकजी मोरे, बाबासाहेब जाव, पुरुषोत्तम बोर्डे उपस्थित होते. यावेळी देऊळगावराजा तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संतोष जाधव, लोकशाही पत्रकार संघाचे अमोल हरणे यांचा सत्कार करण्यात आले. तसेच मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पदी प्रकाशचंद साकला यांचा सत्कार मान्वारांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गजानन धांडे आणि राजेंद्रजी काळे यांनी मनोगत व्यक्त करुन पत्रकारांना एकत्र येवून काम करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमाताई राऊत यांनी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीले घेण्यात आलेले उपक्रम आणि संपूर्ण माहिती विषद केली. तसेच येणाºया काळात पत्रकारांसाठी हक्काचा घर देण्यासाठी पत्रकार कॉलोनी उभी करण्या येणार असल्याची माहिती दिली. पुढे बोलतांना जिल्हाध्यक्ष बर्दे म्हणाले की, पत्रकारांनी आपली काम करण्याची पद्धत बदलावी जेणे करुन येणाºया काळात पत्रकारांची छवी समाजा समोर चांगली यावी जिल्हा पत्रकार संघ पत्रकारांचे न्याय ह्ककासाठी नेहमी लढाई लढणार आहे. सर्व पत्रकारांनी सोबत राहून एकजुट होवून काम करावे असे आवाहान केले. मातृतीर्थ ताुलका पत्रकार संघाची नविन कार्यकारणीची घोषणा , सचिव प्रशांत पंडित, कोषाध्यक्ष रवि जाधव, प्रसिद्धी प्रमुख शब्बीर खान पठाण यांची अविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रंजित खिल्लारे यांनी केले तर आभार सन्मती जैन यांनी व्यक्त केले. यावेळी अशरफ पटेल, पंढरीनाथ गिते, ओम पºहाड, अंबादास बुरकुल, बाबासाहेब साळवे, गजानन भालेकर, देविदास बोराटे आदी उपस्थित होते.











































