Home महत्वाची बातमी संत योगी भिकाराम महाराज यांचा जन्मउत्सव रद्द

संत योगी भिकाराम महाराज यांचा जन्मउत्सव रद्द

178

अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे तालुक्यातील आष्टा या भिकाराम महाराजांचे जन्मगावी दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा त्यांचा जन्मउत्सव शासनाच्या कोरोना नियमावली नुसार सर्व नियम पाळून विश्वस्त मंडळा कडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.

या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात.व महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात. परंतु शासनाचे कडक नियमानुसार व कडक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे भाविक भक्तांना यावर्षी सुद्धा महाराजांच्या दर्शनाला येता आले नाही.
यावेळी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा. सुरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा येथे येणाऱ्या सर्व रस्त्यावर कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. व कार्यक्रम स्थळी होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर ठाणेदार सुरज तेलगोटे हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांन समवेत काळजीपूर्वक लक्ष ठेवून असल्याचे निदर्शनास आले

प्रतिनिधी -प्रशांत नाईक